आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायालयाचे नियम धाब्यावर; शेलारांवर फडणवीस कारवाई करणार का ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नियमांच्या चौकटीत राहून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा दावा कालपर्यंत करणाऱ्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील दहीहंडी उत्सवातच उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे. त्याबाबत विचारणा करण्यासाठी आलेले माध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरे पाहताच शेलारांनी चक्क धूम ठोकली. त्यामुळे शेलारांच्या या नियमभंगाची दखल घेत गृहखात्याचा भार सांभाळणारे मुख्यमंत्री आपल्याच पक्षाच्या मुंबई अध्यक्षावर कायदेशीर कारवाई करणार का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
दहीहंडी या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर त्याची नियमावली आणि धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती. या समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे मुंबई अध्यक्ष असलेल्या आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीची जवळपास दररोज एक याप्रमाणे बैठक घेत, या मुद्द्याचा वापर प्रसिद्धीसाठी करत शेलारांनी दर दिवशी पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावला होता. मुंबई उच्च न्यायालयानेही दहीहंडीवर काही निर्बंध घातले होते. यात थरांची उंची २० फुटांपेक्षा अधिक नसावी. तसेच १२ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागावर बंदी घालतानाच न्यायालयाने सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देशही आयोजकांना दिले होते. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्देशाचे पालन करत आम्ही नियमावली तयार केल्याचा दावा खुद्द आशिष शेलार यांनी केला होता. पण शेलार यांनी केलेले दावे फोल ठरले असून ते आयोजक असलेल्या उत्सवादरम्यान जोगेश्वरीच्या जय जवान दहीहंडी पथकाने तब्बल ९ थर लावले.