आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dahihandi Festival, 20 Injured, One Critical At Sion Hospital With Head Injury

PHOTOS: ठाण्यात दहीहंडीत एकाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू, कोर्टाचे आदेश धाब्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मुंबईतील एका गोविंदा पथकाने नऊ थर लावत यशस्वी सलामी दिली आहे)
मुंबई- दहीहंडी फोडताना गंभीर जखमी होण्याच्या व मृत्युमुखी पडण्याच्या काही घटना घडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने दहीहंडीला चाप बसविला असला तरी आज सुरु असलेल्या दहीहंडी उत्सवात सुमारे 43 गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ठाण्यात दहीहंडीच्या ठिकाणी मदतनीस म्हणून काम करीत असलेल्या राजेंद्र आंबेकर या 49 वर्षीय इसमाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या आदेशाची सर्वत्रच पायमल्ली होताना दिसत आहे. 65 डेसिबेलपेक्षा सर्वत्र आवाज आहे.
मुंबईतील गिरगाव येथे दहीहंडी फोडताना थरावरून घसरून सुमारे 16 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. इतर काही ठिकाणी झालेल्या घटनांत 30 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांना मुंबईतील विविध रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संध्याकाळपर्यंत जखमी गोविंदांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई व ठाण्यातील प्रमुख रूग्णालयांनी गोविंदासाठी काही खाटा राखीव ठेवल्या आहेत. तसेच डॉक्टरांची पथकेही तयार ठेवली आहेत. जेजे हॉस्पिटल, केईएम, नायर व सायन हॉस्पिटलसारख्या रूग्णालयाचा समावेश आहे.
पोलिसांची करडी नजर- सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या गाईडलाईन्ससनुसार दहीहंडी उत्सव पार पडतो की नाही यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई व परिसरात सुमारे 30 हजार पोलिस तैनात केले आहेत. मुंबईतील सुमारे एक हजार दहीहंडी मंडळांनी (उंच थराच्या व धोकादायक अशा फक्त) उत्सवाचे आयोजन केले आहे. तर, सुमारे दीड हजार लहान स्वरूपाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. ठाणे व परिसरात 600-700 मंडळांनी आयोजन केले आहे. आयोजकांनी सुरक्षा उपाय योजना केल्या आहेत की नाही याची चाचपणी केली जात आहे. तसेच काही अप्रिय घटना घडल्यास गुन्हे नोंदविण्याच्या सूचना केल्या आहेत. आयोजकांनी गोविंदा पथकांच्या सुरक्षेची खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र, अनेकांनी दहीहंडीच्या ठिकाणी गाद्या टाकल्या नसल्याचे दिसून येत आहे. यावरून पोलिसांनी आयोजकांवर दबाव वाढविला आहे. दरम्यान, राम कदम यांच्या दहीहंडीला शाहरुखने हजेरी लावली. यावेळी त्याने मंचावर उभारण्यात आलेली प्रतिकात्मक दहीहंडी फोडली.
पुढे पाहा, मुंबईतील अमेरिकन दूतावासाने साजरी केलेल्या दहीहंडी उत्सवाचा व्हिडिओ...आणि मुंबईतील इतर फोटो....