आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dahihandi Festival From Now Adventure Game Sports Minister Tawade

दहीहंडीचा समावेश आता साहसी क्रीडा प्रकारात- क्रीडामंत्री तावडेंची विधानसभेत माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गेल्या काही वर्षात अनेक गोविंदाचा दहीहंडीदरम्यान मृत्यू झाल्याने मुंबई हायकोर्टापासून सुप्रिम कोर्टाने या खेळावर बंदी आणल्याने राज्य सरकारने दहीहंडीला आता सरकारी कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. दहीहंडीचा समावेश आता साहसी क्रीडा प्रकारात समावेश केल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.
नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रश्नोंत्तरांच्या तासात दहीहंडीबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी विनोद तावडे यांनी दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश केल्याची माहिती दिली. मागील काही वर्षापासून दहीहंडी उत्सव हा सण न राहता तो एक मेगा इव्हेंट झाला होता. त्याचा राजकीय व सामाजिक पातळीवर फायद्यासाठी वापर केला जात आहे. याचमुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून 1 लाखांपासून 25 ते 50 लाख रूपयांपर्यंत बक्षिसे ठेवली जात आहेत. अशी भलीमोठी बक्षिसे जिंकण्यासाठी हजारो युवक गोविंदा बनून या उत्सवात सहभागी होत होते. मात्र, याचकाळात काही दुर्देवी घटना घडल्या. अनेक बालगोविंद मृत्यूमुखी पडले होते तर काही जखमी होत असत. काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. या जीवघेण्या स्पर्धेच्या व मेगा इव्हेंट दहीहंडी साजरी करण्याच्याविरोधात काही जाणकार मंडळींनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. जनतेच्या भावनेची दखल घेत मुंबई हायकोर्टाने 18 वर्षाखालील गोविंदांच्या सहभागाला बंदी घातली होती. याबरोबर हा उत्सव साजरा करताना ही अटी घालून दिल्या आहेत.
दहीहंडी उत्सव साजरा करताना मुंबई हायकोर्टाने निर्बंध घातले होते. तसेच काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली होती. त्यानुसार, 18 वर्षाखालील गोविंदाना दहीहंडीत सहभागी होण्यापासून बंदी घालण्याबरोबर कोणत्याही आयोजकांना, मंडळाना 20 फुटांपेक्षा जास्त उंचीची हंडीही बांधता येणार नाही. तसेच या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचे नाव, पत्ता, वयाचा दाखला, फोटो याबाबतची माहिती 15 दिवस अगोदर स्थानिक पोलिसांनी देऊन परवानगी घ्यावी लागणार आहे. बालहक्क आयोगाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करण्याबरोबरच डांबरी व सिमेंटच्या रस्त्यावर दहीहंडी उत्सव साजरा न करणे, गादीसारख्या मऊ थरावरच ही स्पर्धा घेणे, गोविंदाना सुरक्षा बेल्ट व हेल्मेट पुरविणे आदी निर्बंध मुंबई हायकोर्टाने घातले आहेत. दहीहंडी आयोजकांनी या सर्व उत्सवाची जबाबदारी घ्यावी. तसे न झाल्यास व यातून काही अनुचित घटना घडल्यास त्याला दहीहंडी आयोजक जबाबदार असेल असे मुंबई हायकोर्टाने म्हटले होते. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला होता. अखेर सरकारने याला सरकारी कवच देत साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.