आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहीहंडी: दहाव्या थरासाठी ‘संघर्ष’, लाखोंची बक्षिसे लावण्याची राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘ढाक्कामाकुऽऽऽम’च्या तालावर ढोल- ताशांचा गजर व ‘गो... गो.. गोविंदा’च्या जयघोषात गुरुवारी दहीहंडीनिमित्त मुंबई व ठाण्याचा परिसर दणाणून गेला होता. हजारो गोविंदा पथकांची यंदा दहाव्या थरासाठी चढाओढ सुरू होती, युवतीही त्यात मागे नव्हत्या. मुंबईतील एकलव्य, संकल्प तर ठाण्यातील संस्कृती आणि संघर्ष या सर्वाधिक मोठ्या दहीहंड्यातील लाखोंच्या बक्षिसांचा ‘काला’ कोणते पथक पटकावणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


घाटकोपर येथे मनसे आमदार राम कदम यांनी दहीहंडी बांधली होती. या ठिकाणी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने हजेरी लावून गोविंदांचा उत्साहात भर टाकली. या वेळी राम कदम यांनी ज्ञानेश्वरीच्या 25 हजार प्रतींचे वाटप केले. शाहरुखने लुंगी डान्स करत उपस्थितांची मने जिंकली.


वरळी येथील जांबोरी मैदानावर राष्‍ट्रवादीचे राज्यमंत्री सचिन अहिर यांची दहीहंडी आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या ही दहीहंडी मुंबईतील मोठ्या बेगमीची म्हणून ओळखली जाते. हेमामालिनी यांच्या कन्यांचा फरफॉर्मन्स येथील मोठे आकर्षण होते. रात्री आठपर्यंत तब्बल 220 पथकांनी येथे सलामी दिली.

पुढील स्लाइडही वाचा......