आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dairy Farming Minister Eknath Khadse Issued Notices

‘महानंद’वर प्रशासकराज ? दुग्ध व्यवसायमंत्री एकनाथ खडसेंनी बजावल्या नोटिसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील सहकारी दूध संघाची शिखर संस्था असणाऱ्या ‘महानंद’चा गेल्या काही वर्षांमधील कारभार बुडीत होत चालला असताना काँग्रेस आघाडी सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. मात्र, आता डोक्यावरून पाणी वाहून जात असल्याचे लक्षात येताच भाजप- शिवसेना युती सरकारने महानंदवर प्रशासक नियुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यासंदर्भात महानंदच्या सर्व संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून या नोटिसीला १५ दिवसांत उत्तर देण्याच्या आदेशही दिले आहेत. पशु व दुग्ध व्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
महानंद संचालकांच्या आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे ही संस्था अार्थिक डबघाईला आली होती. गेली अनेक वर्षे या कारभारािवषयी आक्षेप उपस्थित करण्यात आले. अाॅडिट विभागाने ताशेरे ओढूनही आघाडी सरकारमधील काही वजनदार मंत्र्यांचा महानंदच्या संचालकांना आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाई हेात नव्हती. मात्र, आता गैरव्यवहाराचे ठपके असलेल्या सर्व संचालकांना उत्तर देण्यासाठी पंधरा िदवसांची मुदत देण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराचे नमुने : विदेश दौऱ्याच्या नावाखाली उधळपट्टी
सरकारची कोणतीही परवानगी न घेता महानंदच्या संचालकांनी इस्रायल, चीन अादी देशांच्या दाैऱ्याचे अायाेजन केले हाेते. विशेष म्हणजे परदेश दौऱ्याचे कारण देऊन निधी घेण्यात आला खरा, पण त्याचा वापर काही झाला नाही. कारण परदेश दौराच या संचालकांनी केला नव्हता.
महानंदचे प्रचंड नुकसान करून सोन्याची नाणी संचालकांना तसेच मंत्र्यांनाही वाटण्यात आली होती.
महागड्या गाड्यांसाठी करोडो रुपये महानंदच्या तिजोरीतून उचलण्यात तर आलेच, पण गाड्यांच्या नंबर प्लेटसाठीही दीड ते दोन लाख खर्च करण्यात आले होते.

कित्येक दूध संघांना सहकारी कायद्यात तरतूद नसतानाही मनमानीपणे सभासद करून घेण्यात आले. सरकारकडून ६० कोटी रुपये घेऊनही पुणे िजल्ह्यातील वरवण येथे दूध भुकटी कारखाना आजही अपूर्ण अवस्थेत आहे.

विदर्भ विकास व मराठवाडा पॅकेजअंतर्गत सरकारकडून मिळालेल्या लाखो रुपयांच्या िनधीचा योग्य वापर झाला नाही. यामुळे सरकारच्या अनेक योजना अयशस्वी ठरल्या.
सहकार कायद्यातील प्रवास भत्त्याच्या मर्यादेचे उल्लंघन करून संचालकांनी सुमारे २५ लाख रुपये उकळले होते. महानंदला दूध पुरवठा करणे सदस्य संघांना बंधनकारक असतानाही या संघांशी संबंिधत असलेल्या संचालकांनी बाहेरच्या दूध डेअऱ्यांना चढ्या दराने दूध पुरवठा केला होता.
अजित पवारांकडून अाधीच राजीनामा
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ‘महानंद’चा ताबा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सूचनेवरूनच संचालकांची िनयुक्ती होत होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा महानंदचे संचालक होते. गेल्या तीन-एक वर्षांत महानंदचा कारभार रसातळाला गेल्याने वर्षभरापूर्वीच पवारांनी संचालकपदाचा राजीनामा िदला होता. काही काळ माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडेही महानंदचे अध्यक्षपद हाेते.
अहवालाच्या आधारे कारवाई : खडसे
दूध व्यवसायामधून मिळालेला फायद्याला वटाव म्हटले जाते. हा सुमारे ३२ कोटींचा वटाव संचालकांनी अापल्या संबंधित दूध संघांना वाटला होता. २००९ ते १२ च्या महानंदच्या लेखा परीक्षण अहवालात शासकीय लेखा परीक्षक सदानंद पुरव यांनी अार्थिक गैरव्यवहाराचे हे सर्व ताशेरे ओढले होते. त्यामुळे महानंदचा ‘अ’ दर्जा घसरून तो ‘ब’ वर आला होता. याच अहवालाच्या आधारे संचालकांवरून कारवाई करून प्रशासक नियुक्त करण्यात येत असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.