आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी प्रकरणी फैसला मुस्लिमांच्या बाजूने आला तरी जागा हिंदूनाच देणार- कल्बे सादिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्बे सादिक यांनी बाबरी मशिदीप्रकरणी निकाल मुस्लिमांच्या विरोधात गेला तरी त्यांनी तो स्वीकारवा, असे आवाहन केले. - Divya Marathi
कल्बे सादिक यांनी बाबरी मशिदीप्रकरणी निकाल मुस्लिमांच्या विरोधात गेला तरी त्यांनी तो स्वीकारवा, असे आवाहन केले.
मुंबई- धर्मगुरू दलाई लामा यांनी आज जेव्हा एका कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांची दाढी खेचली तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी उपस्थितांना हसू अनावर होत होते. मुंबईत ‘वर्ल्ड पीस अँड हार्मोनी’ या कार्यक्रमात जगभरातील दिग्गज व्यक्तींनी शांततेचा संदेश दिला. तर बाबरी मशिदीचा फैसला मुस्लिमांच्या बाजूने आला तरी जागा हिंदूनाच देऊ, असे वक्तव्य शिया मुस्लिम धर्मगुरू कल्बे सादिक यांनी केले.  
 
या कार्यक्रमात योगगुरू रामदेवबाबा आणि दलाई लामा यांच्यासह इतर अनेक दिग्गजही सहभागी झाले होते. सगळ्यांनी जागतिक आणि देशातील शांततेबाबत आपली मतं मांडली.
शिया मुस्लिम धर्मगुरू कल्बे सादिक यांनी बाबरी मशिदीबाबत मुस्लिमांच्या विरोधात निर्णय आला तरी तो शांततेने स्वीकारा असे आवाहन यावेळी केले. या कार्यक्रमात जेव्हा दलाई लामा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी योगगुरू रामदेवबाबांना आपल्या जवळ बोलावून घेतले. एवढेच नाहीतर त्यांची दाढी पकडून खेचली आणि त्यांच्यासोबत काहीशी मस्करीही केली. ‘विश्व शांती’ या उद्देशाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात ही दृश्यं पाहून लोक हसले. त्यानंतर रामदेवबाबांनीही स्टेजवर योगासनं करून सगळ्यांची मनं जिंकली.
 
योगगुरू रामदेवबाबा भाषण करत होते तेव्हा त्यांनी दलाई लामांवर स्तुतीसुमनं उधळली, चीनचा विश्वास युद्धापेक्षा शांततेवर जास्त आहे तसे नसते तर दलाई लामा आज या कार्यक्रमात आलेच नसते असे वक्तव्य रामदेवबाबांनी केले. तर बाबरी प्रकरणी शिया धर्मगुरू कल्बे सादिक यांनीही आपले विचार मांडले, हिंदू बांधवांच्या बाजूनं निर्णय आला तर मुस्लिमांनी तो निर्णय स्वीकाराला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो, व्हिडिओ आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...