आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalit Student Nitin Aage Murder Case, Govt Ready To Run Case In Fast Track Court

दलित युवकाची हत्या: खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, उज्ज्वल निकम यांच्याकडे जबाबदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ जामखेड- अहमदनगर जिल्हय़ातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावच्या नितीन आगे या दलित युवकाच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत असून राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेतल्याचे चित्र आहे. या घटनेतील सर्व 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आगे कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. या खटल्याची जबाबदारी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी आगे कुटुंबियांची भेट घेऊन सरकारतर्फे 5 लाख रूपये देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलकडून 5 लाख रूपये देण्यात येणार आहेत. याचबरोबर नितीन यांची धाकटी बहिण हिच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार घेईल असे सांगितले. नगर जिल्ह्यातील नेते बबनराव पाचपुते, रामदास आठवले यांनीही आगे कुटुंबियांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करू असे म्हटले आहे.

खर्डा येथील हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिका-यांसह पोलिस अधिक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकार्‍यांना तेथे पाठवण्यात आले होते. अँट्रासिटी कायद्याअंतर्गत दाखल होणार्‍या गुन्हय़ांचा खटला न्यायालयात उभा राहत असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हय़ात पोलिस काहीच करत नाहीत, हा आरोप चुकीचा आहे. दलित युवकाचे प्रकरण पोलिसांनी गंभीरतेने घेतले आणि दोन दिवसांत सर्व आरोपींना अटक केली, असे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी दिले. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनीही आगे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी जे-जे करता येईल त्यासाठी आपण स्वत: लक्ष घालू असे म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेतील उच्चवर्णीय आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याने व गृहमंत्रीपदही राष्ट्रवादीकडे असल्याने आगे कुटुंबियांना न्याय मिळेल का असा सवाल उपस्थित केला असता मोघे यांनी म्हटले आहे की, गृहमंत्री आर आर पाटील हे कर्तृव्यनिष्ठ मंत्री आहेत. संबंधित आरोपी त्यांच्या पक्षाशी संबंधित असले तरी आर आर हे तपासाकामात कोणतेही ढवळाढवळ करू देणार नाहीत असा मला विश्वास आहे. तसेच आपणही यात बारकाईने लक्ष ठेवू असे मोघे यांनी म्हटले आहे.
पुढे वाचा, या हत्या प्रकरणाशी संबंधित ताज्या घडामोडी...