आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईवर अाभाळमाया; सर्व धरणे भरण्याच्या बेतात, आठ दिवसांपासून दमदार पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई परिसरात आठ िदवसांपासून दमदार पाऊस झाल्याने शहर व उपनगर चिंब झाले अाहे. शहरातील पवई तलाव भरून वाहत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे व नाशिक िजल्ह्यांतील सातही धरण क्षेत्रात सध्या दमदार पाऊस कोसळत अाहे. गेल्या २४ तसांत धरणांतील पाणीसाठ्यात दहा हजार दशलक्षांनी वाढ झाल्याने मुंबईकरांच्या पाण्याची िचंता मिटली आहे.

गेल्या २४ तासांत शहरात ७१ मिमी, पूर्व उपनगरात ९५, तर पश्चिम उपनगरात १०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या मोठ्या भरतीचा दिवस नेमका रविवार गाठून आल्याने समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी मुंबईकरांनी किनाऱ्यांवर मोठी गर्दी केली होती. गेटवे, नरिमन पाॅइंट, गिरगाव, वांद्रे, वर्साेवा येथे ४.७२ मीटर उंचीच्या उसळणाऱ्या लाटांचा अानंद लुटताना नागरिक िदसत होते.

पालघर िजल्ह्यातील सूर्या नदीला पूर आला आहे. वसई-िवरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या म्हसवण पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलमध्ये गाळ साचून वीजपंप जाम झाले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा गेल्या १२ तासांपासून बंद आहे. पुढच्या २४ तासांत तुरळक सरी कोसळतील, असा वेधशाळेचा अंदाज अाहे.
बातम्या आणखी आहेत...