आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्सबारसंदर्भात सरकार नव्याने कायदा आणणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डान्सबार बंदीचा कायदा करून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेतली खरी; पण त्यात उणिवा राहिल्याने सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकू शकला नाही. सरकारचे हसे झाले. या बंदीसंदर्भात तोंडावर पडलेल्या राज्य सरकारला डान्सबार पुन्हा सुरू होत असल्याने जाग आली असून ते बंदच राहावेत यासाठी आता नव्याने कायदा केला जाईल. यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू असताना डान्सबारसंबंधी गृहमंत्र्यांनी शनिवारी विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व पक्षांच्या गटनेत्यांना बोलावण्यात आले. कुठल्याही परिस्थितीत पुन्हा डान्स बार सुरू होता कामा नये, यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती स्थापन करून पुढील आठवड्यात अध्यादेश काढण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायदा रद्द केला असला तरी डान्सबारचे नवीन परवाने देण्यात येणार नाहीत. तसेच जुन्यांच्याही नूतनीकरणाला परवानगी न देण्याचा सरकारचा विचार आहे.