आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेकायदा डीजे वाजवल्याप्रकरणी बारवर कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात डान्सबार वर बंदी असताना देखील परवानगी न घेता रात्री उशिरापर्यंत बेकायदा डीजे वाजवल्याप्रकरणी वरळी येथील दोन बारवर मुंबई पोलिसांच्या सामाजिक विभागाने कारवाई केली. यामध्ये दोन्ही बारच्या व्यवस्थापकांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
हॉटेलांमध्ये चालणा-या बेकायदा धंद्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोहीम सुरु केली आहे. शनिवारी रात्री कुल सेफ कॅफे आणि जुहू येथील बाटला बार येथे रात्री उशिरापर्यत बेकायदा डीजे सुरू होता. तसेच यावेळी मद्यधुंद अवस्थेत लोक नृत्य करत होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच सामाजिक विभागाचे पथक बारमध्ये दाखल झाले. यावेळी पोलिसांनी प्रदुषण कायद्याअंतर्गत दोन्ही व्यवस्थापकांडून प्रत्येकी 12 हजार 500 रुपये दंड वसूल करून गुन्हा दाखल केला. तसेच दोन्ही बारला यापुढे मोठ्याने डीजे न वाजवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी अश्लिल चाळे करत असलेल्या काही जणांना पोलिसांनी अटक केली.