आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारा सिंग हे एक उमदे व उत्तुंग भारतीय व्यक्तिमत्त्व गमावले- अमिताभ बच्चन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारा सिंग यांचे निधन झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर ट्विट करताना म्हटले की, दारासिंग महान भारतीय होते. एक चांगला माणूस आपल्यातून गेला आहे. त्यांच्या निधनाने एका चांगल्या युगाचा अंत झाला आहे. अमिताभ बच्चन यांचे शब्द दारासिंग यांचे वर्णन करण्यास अत्यंत योग्य आहेत. दारासिंग खरोखरच खुल्या दिलाचे आणि सगळ्यांचे मनापासून स्वागत करणारे होते.
चित्रपट क्षेत्रात असूनही त्यांना 'ग' ची बाधा झाली नव्हती. प्रत्येकाशी ते अत्यंत आपुलकीने वागत आणि मोठय़ा आवेशाने भेटत असत. त्यांना भेटणारी कोणीही व्यक्ती या मताशी सहमत असेल. सेटवर असताना ते प्रत्येक कलाकाराशी चर्चा करीत. गप्पांमध्ये जर त्यांच्या पूर्वीच्या म्हणजे ते जेव्हा कुस्ती खेळत तेव्हाच्या आठवणी काढल्या की, ते फार रमून जात असत. आपण कसा व्यायाम करायचो, कुस्ती खेळताना कशा नवीन पकडी तयार केल्या याचे वर्णन ते रंगून करीत असत. कुस्तीच्या अनेक आठवणी ते सांगत. त्यांचे विविध खेळांवर खूप प्रेम होते, पण क्रिकेटची त्यांना विशेष आवड नव्हती.
बॉलीवूडचे कलाकार पूर्वी घरी सगळ्यांना भेटत असत. दारासिंगसुद्धा जुहूस्थित आपल्या बंगल्यात नेहमी भेटत असत. घरी आलेल्यांचे स्वागत अत्यंत प्रेमाने केले जात असे. त्यांनी गप्पांसाठी थोडा वेळ दिला असला तरी ते तास-दीड तास सहज गप्पा मारत. त्यांच्या गप्पांमध्ये राजकारणाचा विषय निघाला की, ते थोडेफार खुलत. देशावर त्यांचे प्रचंड प्रेम होते आणि त्यांच्या वागणुकीतूनही त्यांनी हे नेहमी दाखवून दिले आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपल्या जाट समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी खूप काम केले. त्यांचे पंजाबवर जसे प्रेम होते तसेच महाराष्ट्रावरही प्रेम होते. महाराष्ट्रातील विशेषत: कोल्हापूरच्या पहिलवानांसंबंधी त्यांना सगळी माहिती होती. राज्य सरकारने चांगले प्रयत्न केले तर महाराष्ट्रातही चांगले पहिलवान तयार होतील असे त्यांचे म्हणणे होते. यासाठी ते मदत करण्यासही त्यांची तयारी होती. कोल्हापूरच्या काही आखाड्यांशी त्यांनी बोलणेही केले होते, परंतु राज्य सरकारने त्याची म्हणावी तशी दखल न घेतल्याची खंत ते नेहमी व्यक्त करून दाखवत.
आलेल्या प्रत्येकाशी दारा अत्यंत प्रेमाने वागत. बोलत आणि त्याचे मनपासून स्वागत करीत. केवळ बॉलीवूडच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अनेक मित्र जोडले होते. कधीही कोणीही फोन केला की, ते व्यस्त असले तरी फोनवर बोलत असत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कधीही वाटले नाही की एकेकाळी बॉलीवूडवर राज्य करणार्‍या आणि अजूनही बॉलीवूडमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीबरोबर बोलत आहोत. काही वर्षांपासून ते आजारी होते. गुडघे काम करीत नसल्याने त्याना चालताना खूप त्रास होत असे. तरीही ते विविध कार्यक्रमांना आवर्जून जात. अनेक गरजूंना त्यांनी मदत केली होती. मात्र, कधीही त्यांनी याचा प्रचार केला नाही. रुस्तम-ए-हिंद-दारासिंग यांच्या निधनाने आपण एका महान व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत.
घरघरांत पोहोचले- 62 व्या वर्षी हनुमानची भूमिका : दारासिंग यांनी 62 व्या वर्षी रामायण मालिकेत हनुमानाची भूमिका केली. 87 मधील या मालिकेने त्यांना घराघरांत पोहोचवले. लवकुश चित्रपट, बजरंग बली आणि लवकुश या मालिकेतही त्यांनी हनुमान साकारला. व्यायामशाळेच्या उद्घाटनानिमित्त ते प्रथमच जिल्ह्यात आले होते. त्यांना पाहण्यासाठी मराठवाड्यातील 15 ते 20 हजारांच्या वर नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यांच्या हस्ते हडको येथील व्यायामशाळेचे भूमीपूजन आणि शहरातील मुख्य वसाहत असलेले शिवाजीनगरचे नामकरण त्यांच्या हस्ते करण्यात आल्याची आठवण बोंबले यांनी सांगितली. त्या काळात त्यांच्या देहयष्टी व कुस्तीबरोबरच अभिनयाचे अनेक चाहते होते. ते युवा कुस्तीपटूंचे तेव्हा ऑयडॉल होते, असेही बोंबले म्हणाले.2007 मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाप्रसंगी विशेष निमंत्रणाचा मान राखत ते शहरातआले होते. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्याचे स्वागत केले होते.
एरंडोलची सभा स्मरणात..- 42004 मध्ये मी केंद्रीय मंत्री असताना लोकसभा निवडणुकीसाठी खासदार दारासिंग प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. एरंडोल येथे आयोजित प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी गर्दीत मी त्यांच्यापासून लांब जाऊ नये म्हणून त्यांनी माझा हात घट्ट पकडून ठेवला होता.गर्दीला भेदत दारासिंग हे सर्वाकडून स्वागत स्वीकारत चालत होते. त्यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. आम्ही दोघे दोन टर्म खासदार म्हणून संसदेत सोबत होतो. ग्रामीण भागातील असल्याने ते मला त्यांच्यासोबत प्रचारात नेत असत. त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे वाटते. - एम. के. पाटील, माजी केंद्रीय मंत्री.
8 चित्रपटांची निर्मिती- विशेष : रुस्तम, भक्ति में शक्ति, ध्यानू भगत, सवा लख से एक लडाऊं भगत धन्ना जाट दारासिंग यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत सर्वाधिक 16 चित्रपट अभिनेत्री मुमताजसोबत केले आहेत.
दारासिंग यांना ट्विटवर श्रद्धांजली
अमिताभ बच्चन : दारासिंग यांच्या निधनामुळे एका संपूर्ण दशकाच्या उत्सवी पर्वाचा अंत झाला आहे. एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा भारतीय आणि तितकाच चांगला माणूस आपण गमावला.
अक्षय कुमार : दारासिंग हे प्रत्येक मुलासाठी हनुमान होते, सर्व पहिलवानांचे देव होते आणि मला प्रेरणा देणारे खरेखुरे अँक्शन हीरो होते. त्यांच्या निधनाने आपल्यापासून जगातील आणखी थोडे चांगुलपण आपल्यापासून हिरावून घेण्यात आले आहे.
शाहरुख खान : कठोर मेहनत, ध्यास आणि अतिशय दुर्मिळ असलेली साहसी वृत्ती यांच्या मिर्शणातून मल्ल घडत असतात. आपल्या सर्वांच्या दृष्टीने सुपरमॅन असणार्‍या दारासिंगजींना ही विशेषणे तंतोतंत लागू पडतात.
अनुपम खेर : दारासिंग यांची प्रतिमा लार्जर दॅन लाइफ अशीच होती. पण आपल्या अस्तित्वामुळे इतरांमध्ये खुजेपणाची भावना निर्माण होईल अशी त्यांची वर्तणूक कधीच नव्हती. एकाच वेळी अतिशय कणखर आणि मृदू असे हे व्यक्तिमत्त्व होते.
अभिषेक बच्चन : दारासिंग यांची कमतरता कायम जाणवत राहील. 'शरारत'च्या वेळी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. स्वभावाने अतिशय नम्र आणि कनवाळू असणार्‍या या माणसाचा आदर्शच माझ्यासमोर होता. दादाजींची उणीव कायमच जाणवत राहील.
..आठवली त्यांची पहिली भेट
औरंगाबाद- रुस्तम-ए-हिंद व ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांच्या निधनाची बातमी कळताच जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. ते औरंगाबाद येथे आले असतानाच्या त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाला. शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक, पदाधिकार्‍यांनी दारासिंग यांच्या भेटीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हातील ज्येष्ठ कुस्तीपटू मोहन बोंबले यांनी सर्मथनगर येथील जय बजरंग व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यासाठी दारासिंग यांना 1984 मध्ये औरंगाबाद येथे आणले होते. त्यावेळी दारासिंग हे दोन दिवस बोंबले यांच्या घरी मुक्कामी होते.
PHOTOS : सिनेअभिनेत्यांनी दिला दारा सिंग यांना अखेरचा निरोप...
LIVE PICS: बॉलिवूडकरांनी घेतले दारा सिंग यांचे अंत्य दर्शन
करीनाला तोकड्या कपड्यात पाहून चिडले होते दारा सिंग
दारा सिंग यांना नाही दिसले मुमताजचे प्रेम !
PHOTOS : दारा सिंग यांचा जीवनप्रवास
VIDEO - दारा सिंग यांचे आठवणीतील काही क्षण
रुस्तम-ए-हिंद दारा सिंग पंचतत्वात विलीन; मुंबईत अंत्यसंस्कार
दारा सिंह यांना ब्रेन हॅमरेज ; विकिपीडियाने ठरवले मृत, ट्विटरवर श्रद्धांजली
PHOTOS : दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर एक नजर
दारा सिंग कृत्रिम श्वासोच्छवासावर, प्रकृती गंभीर