आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांच्या दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली, पंकजा- नामदेव शास्त्रींत वाद पेटणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडे व नामदेव शास्त्री महाराज... - Divya Marathi
पंकजा मुंडे व नामदेव शास्त्री महाराज...
 मुंबई- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. येत्या 30 सप्टेंबर रोजी भगवान गडावर पंकजा मुंडे यांच्या होऊ घातलेल्या दसरा मेळाव्याला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तसेच पंकजा मुंडे यांना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी यंदाही गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर करण्यास विरोध केल्याने पंकजा यांना परवानगी नाकारल्याचे सांगितले आहे. भगवान गडाच्या ट्रस्टने याबाबत एक पत्रकच काढले आहे. दरम्यान, यावरून पंकजा मुंडेंचे समर्थक आणि नामदेव शास्त्री यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार हे स्पष्ट झाले आहे.
 
महंतांना पोलिस संरक्षण हवे
जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात ट्रस्टने म्हटले आहे की, दसऱ्याच्या दिवशी भगवानगडाचा वर्धापनदिन असून या दिवशी महंत व गडाला पुरेसे पोलिस संरक्षण मिळावे. या दिवशी गडावर लाखो भाविक येतात. गतवर्षी जमावबंदी आदेश होता. या दसऱ्याला पोलिस संरक्षण मिळावे. 
 
पाथर्डी तालुक्यात असलेला भगवानगड हा वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आहे. भगवान बाबांना वंजारी समाजात संताचा दर्जा आहे. त्यामुळे दरवर्षी दस-याच्या दिवशी या गडावर लाखो वंजारी समाज जमतो. अर्थात ही परंपरा भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केली होती. ती 2015 पर्यंत सुरु होती. मात्र, गोपीनाथ मुंडे यांचे जून 2014 साली अपघाती निधन झाल्यानंतर ही सूत्रे त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे आली. 2015 साली पंकजांनी भगवान गडावर मोठ्या उत्साहात दसरा मेळावा घेतला. त्याचदरम्यान पंकजांनी बीडमधील परळी येथे गोपीनाथगड बांधण्यास सुरुवात केली. गोपीनाथगड बांधून पंकजांनी भगवानगडाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे नामदेवशास्त्रींचे म्हणणे आहे. 
 
यानंतरच्या काळात, नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वितृष्ट वाढत गेले. त्याचमुळे गेल्या वर्षी शास्त्रींनी पंकजांच्या भगवान गडावरील दसरा मेळाव्याला व भाषणाला विरोध केला. त्याआधी पंकजा मुंडेंच्या समर्थकांवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप झाला. त्यानंतर गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ देणार नाही अशी भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतली. यानंतर पंकजा मुंडे या नामदेव शास्त्रींबाबत वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर पंकजा आणि नामदेव शास्त्री यांच्यातील वाद विकोपाला गेला. 
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, पंकजा मुंडे व दसरा मेळाव्याशी संबंधित माहिती...
बातम्या आणखी आहेत...