Home »Maharashtra »Mumbai» Daughter Of Late RR Patil Launched A Campaign Against Tobacco

कर्करोगाने झाले होते या माजी मंत्र्याचे निधन, आई, पत्नी करत होती शेती मुलीने उचलले हे पाऊल

दिव्य मराठी वेब टीम | Sep 25, 2017, 21:11 PM IST

  • आर. आर. पाटील आणि त्यांची कन्या स्मिता.
मुंबई/कोल्हापूर -माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे 2 वर्षापूर्वी तोंडाच्या कॅन्सरने निधन झाले. त्याची मुलगी स्मिता आजही राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुणांना तंबाखुच्या दुष्परिणामांविषयी माहिती देते. राज्याला आबा म्हणून परिचित असलेले आर. आर. पाटील हे आपल्या कुटुंबासमवेत सांगलीतच राहिले. त्यांची आई आणि पत्नी ते मंत्री झाल्यावरही शेतातच काम करत होते.
काय खास आहे या मोहिमेत
- स्मिता संपूर्ण राज्यात तंबाखुविरोधात मोहिम चालवली आहे. तिने आतापर्यंत 30 महाविद्यालयात याबाबत जागृती केली आहे.
- 16 ते 25 वयोगटातील मुलांना तंबाखुच्या दुष्परिणामाची माहिती दिली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे तिला या कामी सहकार्य मिळते.
- सुप्रिया सुळेंनी सुध्दा गुटख्याविरोधात मोहिम चालवली होती.
- वडिलांच्या निधनानंतर स्मिताची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ती व्यसनांविरोधात मोहिम चालवते.
अधिक काळजी घेण्याची होती गरज
- डॉक्टरांनी आबांना काळजी घेण्यास सांगितले होते. पण त्यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे तब्येतीकडे पुरेसे लक्ष दिले नाही, असे आजही अनेक कार्यकर्त्यांना वाटते.
- 2014 च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी त्यांची तब्येत खराब होऊ लागली होती. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते. पण त्यांनी निवडणुकीनंतर उपचार करु असे सांगितले.
- उपचार सुरु झाले तेव्हा खुपच उशीर झाला होता.
- शरद पवारांनीही त्यांना उपचार करण्यास सांगितले होते.
आई करते आजही शेतात काम
- आर. आर. पाटील यांच्या आईचे वय आता जवळपास 80 वर्ष असल्याचे सांगण्यात येते. आजही त्या शेतात काम करतात.
- आबा राजकारणात असताना त्यांची मुलगी स्मिता शेती सांभाळत होती. ती वडिलांच्या प्रचारातही सहभागी होत होती.
शरद पवारांनी आणले राजकारणाच्या मुख्य प्रवाहात
- शरद पवारांनी काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
- 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सरकार बनवले. त्यावेळी मुख्यमंत्री त्यांना विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री बनविण्यात आले.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended