आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत दलाल तरुणीने देहव्यापारासाठी जन्मदात्या आईला विकले 2 हजारांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एका दलाल तरुणीने देहविक्रीसाठी चक्क जन्मदात्या आईचाच दोन हजार रुपयांत सौदा केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवलीत घडली आहे. हेमा करोतिया (वय-23) असे दलाल तरुणीचे नाव आहे.

 

डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक बनून सापळा लावून आरोपी हेमा करोतिला हिच्या हातात बेड्या ठोकल्या. तसेच तिच्या पीडित आईसह दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली.

 

बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकला छापा...

- डोंबिवली पश्‍चिम रेल्वे स्टेशन जवळील एका हॉटेलमध्ये मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला.

 

आईची सूटका मुलीला अटक...

पीडित आईसह एका तरुणीचीही पोलिसांनी सुटका केली असून आरोपी हेमाला अटक केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...