आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - धाकट्या मुलीच्या लग्नाला हजर राहण्यासाठी एका दिवसाच्या पॅरोलवर सोडण्याची विनंती करणारी अब्दुल गनी तुर्क याची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.
1993 च्या बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात त्याचे अपील प्रलंबित आहे. त्यामुळे त्याला पॅरोलवर सोडण्याबाबत उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकत नसल्याचे मत सुटीकालीन खंडपीठाने या वेळी व्यक्त केले. विशेष टाडा न्यायालयाने 2006 मध्ये अब्दुलला फाशीची शिक्षा सुनावली होती. तो सध्या येरवडा कारागृहात असून त्याच्या मुलीचे 4 जून रोजी मुंबईत लग्न आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने त्याला पॅरोल देण्यासंदर्भात पोलिसांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. पण त्याला सोडण्यासंदर्भात पोलिसांनी नकारात्मक पवित्रा घेतला. त्याला सोडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे पोलिसांनी नमूद केले होते. काही वर्षांपूर्वी आईच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला परवानगी दिली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.