आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिड हेडली बनला ‘माफीचा साक्षीदार’, २६/११ हल्ल्याचे रहस्य उलगडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील न्यायालयाने अमेरिकी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीला २६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्याशी संबंधित खटल्यात माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली आहे. आता ८ फेब्रुवारीला सरकारी साक्षीदार म्हणून त्याची न्यायालयात हजेरी होऊ शकते.

हेडलीची गुरुवारी अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने कोर्टात साक्ष झाली. हेडली म्हणाला की, या कोर्टात माझ्यावर दाखल आरोपपत्र मला मिळाले आहे. माझ्यावर अमेरिकेत जे आरोप ठेवण्यात आले होते, तेच या आरोपपत्रातही आहेत. माझ्यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यात मी सहभागी झालो होतो, हे अमेरिकेत मी मान्य केले आहे. अमेरिकेत प्ली अॅग्रीमेंटद्वारे कबुली दिली होती. या कोर्टातही साक्षीदार म्हणून उपलब्ध होण्यास मी तयार आहे. कोर्टाने माफी दिल्यास मी याच प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. त्यानंतर प्रदीर्घ चर्चेअंती सरकार त्यासाठी तयार आहे, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.

पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक : पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक हेडली लष्कर- ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा भूमिगत एजंट होता. त्याने लष्करच्या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला होता. २००६ व २००८ च्या दरम्यान तो पाच वेळा भारत भेटीवर आला होता. तेव्हा त्याने ताज, ओबेरॉय हॉटेल व नरिमन हाऊस येथे जाऊन व्हिडिओ बनवले. याच ठिकाणांना दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी लक्ष्य केले होते. हेडलीने रेकी केलेल्या मुंबईतील ठिकाणांवर १० दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

त्यातील ९ दहशतवादी मारले गेले होते तर अजमल कसाबला जीवंत पकडण्यात आले होते. नंतर त्याला फाशी देण्यात आली होती. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने २४ जानेवारी २०१३ रोजी हेडलीला दोषी ठरवले होते आणि मुंबई हल्ल्यातील सहभागासाठी ३५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती.
हेडलीला मान्य आरोप
{ दहशतवादी कृत्य करणे { भारताविरुद्ध युद्ध पुकारणे { बेकायदेशीर कृत्य {लष्कर- ए- ताेयबासह मुंबईवर हल्ल्याचा कट रचणे {खून व खुनाचा प्रयत्न {सरकारी कामात अडथळा आणणे {भारतात ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस बेकायदेशीर वास्तव्य { हत्येचा कट रचणे {गोळीबार करणे आणि स्फोट करणे { स्फोटके कायद्याचे उल्लंघन {सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोर्टाने हेडलीला घातलेल्या चार अटी