आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यातील इशरत जहाँ ‘लश्कर’ची सुसाइड बॉम्बर होती- हेडलीची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशरत जहाँ (इनसेट) व चकमकीत मारले गेलेले ते चार दहशतवादी - Divya Marathi
इशरत जहाँ (इनसेट) व चकमकीत मारले गेलेले ते चार दहशतवादी
मुंबई- अहमदाबाद येथे गुजरात पोलिसांनी चकमकीत ठार मारलेली मुंब्य्राची कॉलेज तरुणी इशरत जहाँ ही ‘लश्कर’ची सुसाइड बॉम्बर होती, या असा कबुलीजबाब लश्कर-ए-तोयबाचा अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याने दिला आहे. इशरत ही आमच्या आत्मघातकी पथकातील ‘सुसाइड बॉम्बर’ होती. तिला ‘लश्कर’च्या मुझमिल नावाच्या म्होरक्याने त्या पथकात दाखल करून घेतले होते, अशी माहिती हेडलीने ‘एनआयए’ला दिली आहे.
एनआयए आणि कायदा विभागातील चार अधिका-यांचे एक पथक हेडलीचा कबुलीजबाब घेण्यासाठी शिकागोला गेले आहेत. त्यावेळी त्याने हा गौप्यस्फोट केला आहे. हेडली हा मुंबईवरील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबद्दल शिकागो येथील तुरुंगात 35 वर्षांची कारावासाची शिक्षा भोगत आहे.
ठाण्यातील मुब्रा येथे राहणारी 25 जून 2004 रोजी इशरत जहाँ अहमदाबाद येथील पोलिस चकमकीत मारली गेली होती. मात्र, इशरत निष्पाप होती व ती कॉलेज विद्यार्थिनी होती. ती ‘परफ्यूम’ची सेल्समन होती, असा दावा तिची आई शमिमा कौसर हिने केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने इशरत जहाँच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली होती. कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी आंदोलनही केले होते.
काय आहे इशरत जहाँ प्रकरण?
इशरत जहाँसोबत कारमधून जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई आणि अमजद अली, जिशान जोहर अब्दुल धनी हे दोघे पाकिस्तानी इसम गुजरातमध्ये घुसले होते. विद्यमान पंतप्रधान आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवण्याच्या मोहिमेवर ते चौघे गेले होते. पोलिसांनी त्यांना अहमदाबादच्या सीमेवरच रोखल्यानंतर झालेल्या चकमकीत ते चौघे दहशतवादी ठार झाले होते.
बातम्या आणखी आहेत...