आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे व शिवसेना भवन होते \'लष्कर\'च्या निशाण्यावर; हेडलीचा खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेव्हिड हेडली - Divya Marathi
डेव्हिड हेडली
मुंबई- पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी डेविड कोलमन हेडलीच्या साक्षीला सुरुवात झाली आहे.
अतिरेक्यांसाठी सिद्धीविनायक मंदिरातून मनगटावर बांधण्यासाठी धागे घेतल्याचे कबूल करणार्‍या हेडलीने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सेनाभवनावर हल्ला करण्‍याचा दहशतवाद्यांचा कट होता. राजाराम रेगे याच्या मदतीने शिवसेना भवनात रेकी केल्याचा गौप्यस्फोट हेडलीने केला आहे.

अमेरिकेतील तुरूंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हेडली मुंबईतील विशेष कोर्टात साक्ष देत आहे. हेडलीच्या साक्षीचा आज चौथा दिवस आहे.
सिद्धीविनायक मंदिरातून मनगटावर बांधण्यासाठी 15-20 धागे खरेदी केले होते. मुंबईवरील हल्लेखोरांना त्यांची ओळख लपवता यावी व ते सगळे भारतीय नागरिक वाटावे, हा यामागील मुख्य उद्देश होता, असा हेडलीने खुलासा केला. पाकिस्तानात गेल्यावर ते धागे साजिद मीरला दिले, त्याला ही कल्पना खूप आवडल्याचेही हेडलीने सांगितले. मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब व त्याच्या सहकार्‍यांच्या मनगटावर हे धागे दिसले होते.

हेडलीने शुक्रवारी केले हे खुलासे...
- चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट यांनाही एका बॉडी बिल्डिंग स्पर्धेदरम्यान भेटलो.
- 'मोक्ष' जिमचा ट्रेनर विलासने हेडली व राहुलची ओळख करून दिली होती.
- हेडलीने ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’चीही रेकी केली होती. फोटो व व्हिडीओ शूट केला होता.
- हेडलीने राजाराम रेगेसमोर बिझनेसचा प्रस्ताव ठेवून मैत्री वाढवण्याचा प्रयत्नात होता.
- शिवसेना भवनात राजाराम रेगे याची भेट घेतली होती. त्याला मित्र बनवला. (पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहे राजाराम रेगे?)
- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा लष्कर-ए- तोयबाचा कट होता.
- विलास नामक एका व्यक्तीच्या माध्यमातून राहुल भट्ट ( चि‍त्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा) याच्याशी मैत्री केली होती.
- मुंबईत राहिल्यानंतर 2008 मध्ये 9 ते 15 एप्रिलपर्यंत तो पाकिस्तानातच होता. या दरम्यान, साजिद मीर व मेजर इकबालच्या संपर्कात होता. मुंबईत हल्ला करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांचे व्हिडिओ व फोटो दाखवले.
- गेटवे ऑफ इंडिया, कफ परेड व वरळी भागात त्याने अतिरेक्यांना राहाण्याची व्यवस्था केली होती.
- मुंबई एअ‍रपोर्ट दहशतवाद्यांचे टार्गेट होते. मात्र, हल्ल्यादरम्यान ते सुटले. त्यामुळे मेजर इकबाल खूप नाराज झाला होता.
- 2008 मध्ये 30 जूनपर्यंत पाकिस्तानात राहिल्यानंतर हेडली अमेरिका व फिलाडेल्फियालाही गेला होता.
- या दरम्यान तो तहव्वुर हुसेन राणाच्या फोनवर संपर्कात होता. हल्ल्याविषयी त्याला सल्लाही दिला होता.

हेडलीने तिसऱ्या दिवशीही अनेक गौप्यस्फोट...
डेव्हिड हेडलीने गुरुवारी आपल्या जबाबात गुजरातेतील वादग्रस्त इशरत जहां चकमकीविषयी माहिती दिली आहे. इशरत ही "लष्कर-ए-तोयबा'ची आत्मघातकी बॉम्बर होती, असे त्याने सांगितले.

गुजरात पोलिसांनी 2014 मध्ये या 19 वर्षीय तरुणीसह तिच्या तीन साथीदारांना चकमकीत ठार केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट या चौघांनी आखला होता, असा गुजरात पोलिसांचा दावा होता.


साजिद मीरने व्यक्त केला होता असुरी आनंद...
2008 मधील हल्ल्यानंतर माझी साजिद मीरची भेट झाली. तेव्हा त्याने असुरी आनंद व्यक्त केला होता. लाहोरचा व्यापारी हाजी अशरफ यालाही मी ओळखतो. लष्करला अार्थिक मदत तो करत होता.

अबू काहफा देत होता रक्तपाताची सूचना
मुंबई हल्ल्याच्या वेळी अबू काहफाने हल्लेखोरांना प्रशिक्षण दिले होते. कराचीत ज्या ठिकाणाहून दहशतवाद्यांना भयंकर रक्तपात घडवण्याच्या सूचना दिल्या जात होत्या तिथे काहफा होता. साजिद मीर आणि काहफा हल्लेखोरांना क्षणोक्षणी सूचना देत होत. या दहा हल्लेखोरांत काहफाचा एक पुतण्याही होता, अशी माहिती हेडली याने दिली.

अक्षरधाम हल्ला ही 'बाबरी'ची प्रतिक्रिया...
अबु दुजना याच्यासोबत मी काश्मीरमध्ये लढण्यासाठी गेलो होतो. अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याची एक योजना आखली असल्याची माहिती दुजनानेच तेव्हा मला दिली होती. बाबरी मशीद पाडल्याविरुद्ध (1992) एखाद्या भव्य अशा भारतीय मंदिरावर हल्ला करणे योग्यच आहे असे दुजनाचे मत होते, अशी माहिती पण हेडलीने दिली.

तोयबाचा कमांडर लख्वी याने हेडलीशी बोलताना दहशतवादी मुजम्मिल बट्टवर सोपवण्यात आलेल्या एका मोहिमेतील अपयशाचा उल्लेख केला होता. एक महिला दहशतवादी त्यात ठार झाली होती. हेडलीने जबाबात हे सांगितल्यावर सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी त्याला खाेदून विचारले तेव्हा हेडलीने इशरतबद्दल माहिती दिली. हेडली म्हणाला, "पोलिस चकमकीत एक महिला दहशतवादी मारली गेली होती.' यावर निकम यांनी तीन नावे घेतली. यापैकी इशरत हेच ठार झालेल्या महिलेचे नाव होते, असे सांगून लष्कर-ए-तोयबामध्ये महिलांची वेगळी शाखा असल्याची माहिती हेडलीने दिली.