आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिड हेडलीला होत्‍या 6 गर्लफ्रेंड, केले 3 लग्‍न, रचला 26 /11 हल्‍ल्‍याचा प्लॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेव्‍ह‍िड हेडली (इन्‍सेट  फैजा ओउततला- फाइल फोटो) - Divya Marathi
डेव्‍ह‍िड हेडली (इन्‍सेट फैजा ओउततला- फाइल फोटो)
मुंबई - अमेरिकी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीला मुंबईतील न्यायालयाने 26/11 मुंबई अतिरेकी हल्ल्याशी संबंधित खटल्यात माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली आहे. आता 8 फेब्रुवारीला सरकारी साक्षीदार म्हणून त्याची न्यायालयात हजेरी होऊ शकते. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे डेव्हिड हेडलीच्‍या वैयक्‍त‍िक जीवनाविषयी...
पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक
पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक हेडली लष्कर- ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा भूमिगत एजंट होता. त्याने लष्करच्या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला होता. 2006 व 2008 च्या दरम्यान तो पाच वेळा भारत भेटीवर आला होता. तेव्हा त्याने ताज, ओबेरॉय हॉटेल व नरिमन हाऊस येथे जाऊन व्हिडिओ बनवले. याच ठिकाणांना दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी लक्ष्य केले होते. हेडलीने रेकी केलेल्या मुंबईतील ठिकाणांवर 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सध्‍या अमेरिकेच्‍या करागृहात बंदिस्‍त असून, त्‍याला 35 वर्षांची शिक्षा झालेली आहे.
केले तीन लग्‍न
इंटरपोलच्‍या अहवालानुसार हेडलीने तीन लग्‍न केले असून, त्‍याच्‍या 6 गर्लफ्रेंड होत्‍या. शिवाय त्‍याचे सात महिलांसोबत शरीर संबंधही होते.
असे झाले दुसरे लग्‍न
26/11 हल्‍ल्‍याच्‍या तपासात मोरोक्कोची मूळ रहिवाशी असलेल्‍या फैजा ओउततला या वैद्यकीय शास्‍त्राच्‍या विद्यार्थिनीचे नाव समोर आले. हेडली आणि तिची ओळख पाकिस्‍तानातील लाहौरमध्‍ये झाली होती. त्‍यांनी 2007 मध्‍ये लग्‍न केले. पण, एकाच वर्षात 2008 मध्‍ये त्‍यांचा तलाक झाला. राष्ट्रीय तपास संस्थेने मोरोक्को सरकारकडे फैजाची माहिती मागितली आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, हेडलीचे इतर महिलांसोबत असलेले संबंध....