आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawood Aides Chhota Shakeel Had Wanted To Surrender

छोटा राजनप्रमाणे दाऊदही शरण येण्‍यास तयार होता, दाऊदच्‍या वकिलाचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊस इब्राहिम कासकर (फाइल फोटो) - Divya Marathi
दाऊस इब्राहिम कासकर (फाइल फोटो)
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा त्याचा साथीदार छोटा शकीलसह शरण येण्यास तयार होता, असा दावा एकेकाळी दाऊदचे वकील राहिलेले श्याम केसवानी यांनी केला. ज्‍या अटीवर छोटा शकीलला भारतात आणले गेले त्‍याच अटीवर दाऊदसुद्धा भारतात येऊ इच्छित होता. पण, सरकारने त्‍या अटी मान्‍य केल्‍या नाहीत.

दाऊदच्‍या वकिलाने काय म्‍हटले ?
प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्‍या वक्‍तव्‍याचा संदर्भ देत केसवानी म्‍हणाले, दाऊद आणि छोटा शकील दोघेही सरेंडर करणार होते.
ज्येष्ठ विधिज्ज्ञ जेठमलानी यांनीही केला होता दावा...
मुंबई बॉम्बस्फोटानंतर भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊदने आपल्यालाही फोन करुन आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले होते, असा दावा देशातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांनीही केला होता. दाऊदने स्वत:ला आत्मसमर्पण करण्यास तयार होता. परंतु, त्यासाठी त्याने काही अटी घातल्या होत्या. मुंबई पोलिसांनी आपल्याला 'हाऊस अरेस्ट' करावे. आपल्याला तुरुंगात न ठेवता राहात्या घरी नजर कैदेत ठेवावे, अशी दाऊदची अट होती. मात्र, तत्कालीन सरकारने त्याच्या अटी मान्य केल्या नाही, असेही जेठमलानी यांनी म्हटले होते.

शरद पवारांनीही दिला होता दुजोरा
याला माजी मुख्‍यमंत्री शरद पवार यांनी दुजोरा दिला होता. जेठमलानी यांच्याद्वारे दाऊदचा प्रस्ताव भारत सरकार व महाराष्ट्र सरकारकडे आला होता हे त्‍यांनी मान्य केले. मात्र, दाऊदच्या शरणागतीचा प्रस्ताव स्वीकारण्यालायक नव्हता असे स्पष्टीकरण दिले.
पवार म्‍हणाले होते, ‘जेठमलानी यांनी जो दावा केला तो खरा आहे. त्‍यांनी आपल्‍याकडे दाऊद आणि शकील बाबत प्रस्‍ताव ठेवला होता; पण त्‍यात कधीही पूर्तता न होण्‍या-या अटी होत्‍या.
पुढील स्‍लाइडवर वाचा, नेमक्‍या काय होत्‍या अटी...