आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawood And Tiger Memon Plane Hijack To Free Yakub

याकूबला सोडवण्‍यासाठी करणार होते प्‍लेन हायजॅक; नावेदचा खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पकडलेला गेलेला नावेद. - Divya Marathi
पकडलेला गेलेला नावेद.


मुंबई - जम्मू-कश्मीरमध्‍ये पकडलेला दहशतवादी नावेद याच्‍या चौकशीदरम्‍यान अनेक धक्‍कादायक खुलासे उघड झालेत. गोपनीय सूत्रांच्‍या माहितीनुसार, नावेदने सांगितले, ''याकूब मेमनला सोडवण्‍यासाठी हाफिज सईद, दाऊत इब्राहिम आणि टाइगर मेमन यांनी विमान हायजॅक करण्‍याची योजना आखली होती. त्‍यात प्रवाशांच्‍या बदल्‍यात याकूबला सोडवण्‍याची मागणी ते करणार होते. पण, हा प्‍लॅन कृतीत उतरवण्‍याच्‍या अगोदरच याकूबला फाशी झाली. त्‍यामुळे योजना बदलली गेली'', अशी माहिती त्‍याने दिली.
नावेदच्‍या माहितीनुसार, प्‍लॅनच्‍या यशस्‍वीतेसाठी पाकिस्‍तानमधून दहशतवाद्यांची विशेष टीम पाठवली गेली होती. या टीमला हाफिज सईदचा मुलगा तल्ला सईद याने ट्रेनिंग दिली होती. या टीमसोबत हाफिजने अपल्‍या पीएसओलाही पाठवले होते. कश्मीरमध्‍ये सक्रिय असलेला लष्‍कर-ए-तय्यबाचा कमांडर अबू कासिम याच्‍यासोबतही या योजनेवर दीर्घ केली होती. त्‍यानंतर कासीम याचे टाइगर मेमनसोबत बोलणे झाले. पुढे टीमला घुसखोरी करून पाठवण्‍यात आले. सुरुवातीला विमान अपहरणाचा प्‍लॅन होता. पण, कासीम याच्‍या म्‍हणण्‍यानुसार, ऐनवेळेवर त्‍यात बदल केला गेला. मात्र, दुसरा प्‍लॅन काय होता, याची माहिती नावेदला नाही. त्‍या बद्दल नोमीनला माहिती होती. पण, तो उधमपूर चकमकीत मारला गेला.
हा होता हाफिजचा प्‍लॅन
घुसखोरीसाठी राज्‍याच्‍या वेगवेगळ्या सेक्टरमधील बॉर्डरवर फायरिंग केली गेली. त्‍यामुळे सुरक्षा एजेंसीचे लक्ष फायरिंगकडे लागले. याच संधीचा फायदा घेत कश्मीरच्‍या एका सेक्टरमधून दहशतवाद्यांच्‍या तुकडीला पाठवले गेले. त्‍यांना विमान अपहरणाची ट्रेनिंग दिली गेली. त्‍यामुळे घुसखोरी करताना यातील एकही दहशतवादी मारला जाऊ नये, असे हाफिजला वाटत होते. प्‍लॅनच्‍या यशस्‍वीतेसाठी पाकिस्‍तानाचा दहशतवादी मो. नावेद ऊर्फ उस्मान तथा नोमानला आणले गेले होते. त्‍याच्‍यासह नावेदला पुलवामा येथील दोन भावांच्‍या घरी ठेवण्‍यात आले होते. ते दोघेही भाऊ अवंतीपोरा विमानतळावर काम करत होते. दहशतवाद्यांना विमानतळाच्‍या आत पोहोचवण्‍याचे काम या दोघांवर सोपवण्‍यात आले होते. कश्मीरच्‍या एका व्यापारीने कासिम याला पाच लाख रुपये दिले होते ते यासाठीच की या दहशतवाद्यांच्‍या विमान तिकिटांची व्‍यवस्‍था होईल. पण, हा प्‍लॅन यशस्‍वी होण्‍यापूर्वीच याकूबला फाशी झाली
नावेदला 14 दिवसांच्‍या पोलिस कोठडीत
नावेदला न्‍यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दरम्‍यान त्‍याच्‍याकडून आणखी माहिती मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला जाणार आहे.
.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटो...