आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबच्‍या जनाजाला दाऊदच्‍याच आदेशाने गर्दी; पोलिसांनीही दिला दुजोरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो


मुंबई - 1993 मध्‍ये मुंबईमध्‍ये झालेल्‍या साखळी बॉम्‍बस्‍फोटातील आरोपी याकूब मेमनला मृत्‍यूदंड दिल्‍यानंतर त्‍याच्‍या जनाजामध्‍ये 10 ते 15 हजार लोक सहभागी झाले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने दिलेल्‍या आदेशामुळेच ही गर्दी जमा झाल्‍याचे वृत्‍त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. त्‍याला एका वरिष्‍ठ पोलिस अधिका-यानेही दुजोरा दिला.
या वृत्‍तानुसार, याकूबच्‍या जनाजामध्‍ये 10 ते 15 हजार व्‍यक्‍ती सहभागी झाल्‍या होत्‍या. एवढीच गर्दी मरीन लाइन्‍समधील कब्रस्‍थानातही होती. ही गर्दी जमावी, यासाठी दाऊत आणि त्‍याचा साथीदार छोटा शकील याने फोन कॉलकरून शक्‍तीप्रदर्शन करण्‍याचे आदेश दिले होते. एका वरिष्‍ठ पोलिस अधिका-याने नाव न छापाण्‍याच्‍या अटीवर याला दुजोरा दिला.

काय म्‍हणतात मुस्लिम लीडर्स
जनाजामध्‍ये सहभागी झालेल्‍या बहुतांश नागरिकांना याकूबच्‍या पार्श्‍वभूमीबद्दल माहिती नव्‍हते. शिवाय, समाजातील एक व्‍यक्‍ती म्‍हणून अंत्‍ययात्रेमध्‍ये अनेकजण सहभागी झालेत, अशी प्रतिक्रिया मुस्लिम कम्यूनिटी लीडर्सने दिली.

दाऊद आणि शकीलच्‍या चुप्‍पीचे कारण स्‍पष्‍ट झाले
सूत्रांच्‍या माहितीनुसार, दाऊद आणि शकीलला आशा होती की, सर्वेाच्‍च न्‍यायालय याकूबच्‍या बाजूने निर्णय देईल. त्‍यामुळे आपण काही प्रतिक्रिया दिली तर त्‍या निर्णयावर परिणाम होईल, अशी भीतीही दाऊत आणि शकीलला होता. म्‍हणूनच त्‍यांनी फाशीपूर्वी प्रतिक्रिया देणे टाळले. पण, मृत्‍यूदंड होताच छोटा शकील याने वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीतून धमकी दिली. मात्र, यातून या प्रकरणात तोही सहभागी होता, याला पुष्‍टी मिळाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 30 जुलैला निघालेल्‍या याकूबच्‍या जनाजाचे फोटोज...