आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणाने केला होता एकनाथ खडसे-दाऊदच्या संभाषणाचा खोटा आरोप, वाचा पुढे काय झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/जळगाव- अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या संपत्तीमध्ये त्याच्या वॉरविकशायर येथील हॉटेल आणि आलिशान बंगल्यांचा समावेश आहे. भारतीय चलनात दाऊदची तेथील संपत्ती 4 हजार कोटींच्या घरात मानली जात आहे. दाऊद इब्राहिम संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मोठे यश आल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी फोनवरून संभाषण केल्याचा आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. दाऊद आणि खडसेंतील संभाषणाच्या पुराव्यादाखल भंगाळेने सादर केलेली फोनची बिले बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. या आरोपातून पोलिसांनी खडसेंना यापूर्वीच क्लीन चिट दिली होती.

आपल्या विरोधात षडयंत्र...
भंगाळेच्या माध्यमातून काही लोक आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा खडसेंचा आरोप आहे. दाऊदच्या पाकिस्तानातील घराच्या दूरध्वनी क्रमांकाची बनावट बिले तयार करून भंगाळेने त्याचा फसवणुकीसाठी वापर केल्याची तक्रार खडसेंच्या वतीने आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे पंधरा दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने तातडीने ही कारवाई करण्यात आली होती.

मनीष भंगाळे मूळ जळगावचा...
भंगाळे हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील असून सध्या तो बडोद्यात राहतो. भंगाळेचे आरोप आणि भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात खडसेंना जून 2016 मध्ये महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

खडसेंवरील आरोपांची प्राथमिक चौकशी करून मुंबई पोलिस आयुक्तांनी खडसे आणि दाऊद यांच्यादरम्यान कोणतेही संभाषण झालेले नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. दाऊद आणि खडसेंतील संभाषणाच्या पुराव्यादाखल भंगाळेने सादर केलेली फोनची बिले बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना यांनी सांगितले.

फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्रांचा वापर करणे या आरोपाखाली भंगाळेवर भादंविच्या नियम 468 आणि 471 अन्वये, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सक्सेना म्हणाले.

आता बडे मासेही जाळ्यात अडकतील....
‘भंगाळेचा वापर करून माझे करिअर उद‌्ध्वस्त करण्याचा कट ज्यांनी रचला होता ते मोठे मासे आता अडकतील. भंगाळेला साथ देणारे 7 ते 8 जण जळगावचेच आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. ठोस पुरावे, कागदपत्रे हाती आल्यानंतरच भंगाळेवर गुन्हा दाखल केला.'
- एकनाथ खडसे, माजी मंत्री तथा अामदार

खडसेंना मिळाली आहे क्लीनचीट...
दाऊद इब्राहिमच्या घरातून फोन आल्या प्रकरणी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने क्लीनचीट दिली आहे. सप्टेंबर 2015 ते एप्रिल 2016 या काळात खडसेंचा मोबाइल क्रमांक 9423073*** वर कोणताही कॉल आला नाही.तसेच या क्रमांकावरून कोणताही कॉल करण्यात आलेला नसल्याचे मुंबईचे पोलिस सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले होते.

मनीष भंगाळेने अशी काढली होती दाऊद-खडसेंची माहिती
अंडरवर्ल्ड दाऊदच्या देशातील साम्राज्याची, त्याच्या गुन्हेगारी कटांची माहिती मिळविण्याच्या एका महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी इथिकल हॅकर मनिष भंगाळे काम करत होता. दाऊद नियमित भारताशी संपर्कात असतो. हे सगळ्यांना ठाऊकच आहे. तो कोणाच्या संपर्कात आहे. तो कोणा-कोणाची संवाद साधतो? याबात माहिती हुडकून काढत असताना मनिषला खडसेंबाबत माहिती मिळाली. दाऊदच्या कराचीतील घरातून एकनाथ खडसेंच्या मोबाइल नंबरवर कॉल केल्याचा दावा मनीष भंगाळेने केला आहे. इतकेच नव्हे तर दाऊदच्या कॉल्सचे सीडीआरही त्याच्याकडे उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने एकनाथ खडसेंवर आरोप करताना सरकारसमोर दाऊदशी संपर्क ठेवणार्‍यांच्या डिटेल्स सादर केल्या होत्या.

पुढे वाचा, कोण आहे मनीष भंगाळे.. कोणाला आदर्श मानतो? हँकिंग म्हणजे नेमके काय असते..
बातम्या आणखी आहेत...