आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इक्बाल कासकरला 8 दिवसांची पोलिस कोठडी, अटक झाली तेव्हा खात होता बिर्याणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला त्याची बहिण हसिना पारकरच्या घरातून अटक करण्यात आली. इक्बालला अटक झाली तेव्हा तो बिर्याणी खात होता. तसेच तो हसिना पारकरवर निर्मित सिनेमा 'हसीना : द क्वीन ऑफ मुंबई' पाहात असल्याचे ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.
 
दरम्यान, इक्बालला, खंडणीप्रकरणात बेड्या ठोकल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी इक्बाल याला सोमवारी रात्री उशीरा अटक केली. इक्बाल कासकरने बिल्डरकडून खंडणी म्हणून 4 फ्लॅटची मागणी केली होती. ही टोळी दाऊद चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. इक्बाला कोर्टात हजर केले असता त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रिलिज होण्‍याआधीच पाहाण्यासाठी दिली सिनेमाची सीडी...
- ठाणे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इक्बालला त्याच्या बहिण हसिना पारकर हिच्याकडून अटक करण्यात आले. पकमोडीया स्ट्रीटवरील आपले घरी रिकामे केल्यानंतर इक्बाल अनेक दिवस फॅमिलीसोबत राहात होता. इक्बालसह त्याच्या चार साथिदारांना एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्त्वात ठाणे पोलिसांनी मुंबईतील नागपाडा भागातून उचलले.
- प्रदीप शर्मा आपल्या टीमसह नागपाडा येथील हसीनाचे घर गार्डन हाऊसमध्ये पोहोचले तेव्हा इक्बाल आपल्या कुटुंबियांसोबत हसिना पारकर हिच्या जीवनावर आधारीत सिनेमा 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई' पाहात होता. तसेच तो कुटुंबीयांसोबत बिर्याणी खात होता.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई'चे निर्मात्याची सिनेमा रिलीज होण्याआधी हसीनाच्या फॅमिलीला दाखवण्याची इच्छा होती. मात्र, या वृत्ताला फिल्म स्टाफकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
- पोलिस पोहोचले तेव्हा इक्बालसोबत त्याची पत्नी आणि तीन मुले होते. सोबतच हसीना पारकरचा मुलगा आणि सून आणि मुलगी होती.

22 सप्टेंबरला रिलिज होईल सिनेमा...
- हसीना पारकर हिच्यावर जीवनावर आधारीत सिनेमा 'हसीना : द क्वीन ऑफ मुंबई' मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने हसिनाचा रोक केले आहे.
- दाऊदने दुबईला पलायन केल्यानंतर त्याचा बिझनेस, मेव्हणा इब्राहिम पारकर हा पाहात होता. त्याच्या हत्येनंतर नागपाडा येथे 'गॉडमदर' या नावाने फेमस हसिना पारकरने दाऊदचा बिझनेस सांभाळला होता.
- सिनेमाचे दिग्दर्शन अपूर्व लखिया यांनी केले असून नाहिद खान हे निर्माता आहेत. सिनेमात श्रद्धासोबतच सिद्धांत कपूर आणि अंकूर भाटिया दिसणार आहे.
- सिनेमा 22 सप्टेंबरला रिलीज होईल.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... इक्बाल मागत होता दाऊदच्या नावाखाली खंडणी...
दाऊदच्या नावाखाली खंडणी...
बातम्या आणखी आहेत...