आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट, गर्लफ्रेंड, पार्टीज... मुंबई बॉम्बस्फोटांपूर्वी अशी लाईफ एन्जॉय करायचा दाऊद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1993 मध्ये मुंबईत झालेल्या सिरिअल बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेननला 30 जुलैला फाशीची शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या टाडा न्यायालयाने 53 वर्षीय याकूबला फाशीचा वॉरंट जारी केला आहे. नागपुरच्या सेंट्रल जेलमध्ये त्याला फाशी दिली जाणार आहे. 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या 13 बॉम्बस्फोटप्रकरणी डॉन दाऊन इब्राहिम, याकूब मेनन, टायगर मेनन यांच्यासह काही गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. बॉम्बस्फोटांनंतर दाऊद दुबईत पळून गेला. त्यापूर्वी तो मुंबईत अगदी आलिशान आयुष्य जगत होता. क्रिकेट मॅच, गर्लफ्रेंड आणि पार्टीज त्याच्या आयुष्याचा भाग होता.
याकूब मेननच्या फाशीच्या पार्श्वभूमिवर आम्ही सांगत आहोत, दाऊदच्या लाईफशी निगडित काही फॅक्ट्स...
1993 नंतर मित्र झाले शत्रू
दाऊद आणि छोटा राजन कधी काळी सोबत काम करायचे. क्रिकेट मॅच असो किंवा पार्टीज दोघे सर्वच जागी सोबत दिसायचे. परंतु, बॉम्बस्फोटांनंतर दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. दोघांच्या गॅंगमध्ये बऱ्याच वेळा गॅंगवॉर झाले. दोघांनी एकमेकांना ठार मारण्यासाठी शुटर्स पाठविले. सध्या दोघेही भारताच्या बाहेर आहेत.
अभिनेत्रींना करायचा डेट
बॉम्बस्फोटांपूर्वी दाऊदचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता. डायरेक्टर, प्रोड्युसर यांच्यापासून अॅक्टर-अॅक्ट्रेसेस दाऊदच्या पार्टीत दिसायचे. पाकिस्तानी अॅक्ट्रेस अनीत आयुब आणि मंदाकिनी दाऊदच्या गर्लफ्रेंड होत्या. मंदिकिनीसोबत तो अनेकदा क्रिकेटच्या मैदानावरही दिसला.
पुढील स्लाईडवर बघा, दाऊदचे निवडक फोटो.... वाचा दाऊद बोलतो मराठी....