आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawood Ibrahim Has A Son From Bollywood Actress In India

अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊदचा मुलगा भारतात? नीरजकुमार यांचा गौप्यस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असलेल्‍या दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो, असा गौप्‍यस्‍फोट दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी केला आहे. नीरजकुमार यांनी दिलेल्‍या माहितीनुसार दाऊदने बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीशी विवाह केला आहे. या अभिनेत्रीच्‍या बहिणीकडे बंगळुरूत दाऊदचा मुलगा राहतो, असेही त्‍यांनी सांगितले आहे.
माजी पोलिस आयुक्‍त नीरजकुमार यांनी आपल्‍या ‘डायर डी फॉर डॉन’ या पुस्‍तकात विविध प्रसंगांचे खुलासे केले आहेत. त्‍यांनी असेही म्‍हटले की, कुख्‍यात अंडरवर्ल्‍ड दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनीस याने बॉलीवुड स्‍टार संजय दत्‍त याला शस्‍त्रे दिली. हे दाऊदला कळताच त्‍याने अनीस याला बेदम मारहाण केली होती. दाऊदसोबत अनेक वेळा आपले संभाषण झाल्‍याचे नीरजकुमार सांगतात. त्‍यांनी सांगितले, दाऊदला विचारले, “तुझा लहान भाऊ अनीस याने संजय दत्‍तला शस्‍त्रे पाठवली, हे तुला मान्‍य आहे का ?” त्‍यावर दाऊदने ही गोष्‍ट मान्‍य केली. अनीस आणि संजय दत्त यांच्‍यात ‘यल्‍गार’ चित्रपटाच्‍या शूटिंगदरम्‍यान जवळीकता वाढली. दुबईत हे चित्रकिरण सुरू होते. आपल्‍या कुटुंबाच्‍या सुरक्षेसाठी संजय दत्‍तने त्‍याच्‍याकडे शस्‍त्रे मागितले होते. याच प्रकरणात संजय याला शिक्षा झाली, अशी माहितीही त्‍यांच्‍या पुस्‍तकातून समोर आली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, दाऊदचा बॉलीवुडशी संबंध, एका अभिनेत्रीशी लग्‍न.. या दोघांच्‍या मुलाबद्दलची माहिती..