आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्‍या Richest बिजनेसमॅनपेक्षा दाऊद श्रीमंत, शरीफ-झरदारीसुद्धा मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडोनेशियातील बाली पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला अटक केली. त्‍याला आण्‍यासाठी सीबीआय आणि पोलिसांचे विशेष पथक बालीला रवाना झाले. राजनच्‍या अटकेनंतर दाऊदला अटक करण्‍याच्‍या हालचाली गतीमान झाल्‍यात. इंटेलिजेंसद्वारे मिळालेल्‍या माहितीनुसार, दाऊदकडे दुबई, भारत आणि पाकिस्‍तानासह अनेक देशांत जवळपास 6.7 अब्ज डॉलर म्‍हणजेच 43 हजार 905 कोटी रुपये एवढी संपत्‍ती आहे. विशेष म्‍हणजे दाऊदची संपत्‍ती पाकिस्‍तानातील सर्वात श्रीमंत बिजनेसमॅन मिया मोहम्मद मंशा यांच्‍या दुप्‍पट आहे. एवढेच नाही तर मूळ पाकिस्‍तानचे असलेले आणि सध्‍या अमेरिकेतील श्रीमंतापैकी एक असलेले बिजनेसमॅन शाहीद खान यांच्‍यापेक्षाही दाऊदची संपत्‍ती दीडपट अधिक आहे.
फोर्ब्सच्‍या अहवालानुसार, मिया मोहम्मद मंशा यांची संपत्‍ती 2.6 अब्ज डॉलर म्‍हणजेच 17 हजार कोटी रुपये आहे. तर शाहीद खान यांची संपत्‍ती 5.6 अब्ज डॉलर म्‍हणजेच 39 हजार कोटी रुपये आहे.
झरदारी आणि शरीफ यांनाही मागे सोडले
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची संपत्‍ती 1.8 अब्ज डॉलर म्‍हणजेच11 हजार कोटी रुपये आहे. जी की दाऊदपेक्षा कमी आहे. या शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचीही संपत्‍ती दाऊदपेक्षा कमी असून, ती 1.4 अब्ज डॉलर आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या पाकिस्तानच्‍या टॉप बिजनेसमॅनपेक्षा दाऊदची संपत्‍ती अधिक कशी...