आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सेल्फी पॉइंट झाला आहे दाऊदचा हा बंगला, येथेच त्याने घालवले होते आपले बालपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदची मालकीची हिच ती इमारत. - Divya Marathi
दाऊदची मालकीची हिच ती इमारत.
मुंबई- मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असणाऱ्या कुख्यात गुंड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील 42883 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्यानंतर कोकणातील त्याचे घर पुन्हा चर्चेत आले आहे. रत्नागिरीत त्याचे हे घर आहे. या गावात त्याच्या एकूण 16 मालमत्ता आहेत. या मालमत्तांना आता प्राप्तीकर विभागाने आता सील ठोकले आहे.
 
सेल्फी पॉइंट बनले आहे दाऊदचे घर
- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके या गावात दाऊदचे कुटुंब घर आहे. हे घर त्याचे वडिल इब्राहिम कासकर यांनी बनवले आहे.
- प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर स्थानिक पोलिस येथे अतिक्रमण होऊ नये याबाबत सतर्क आहे.
- आता लोक येथे येऊन सेल्फी काढत आहेत.
- मुंबके या गावात दाऊदच्या या घराव्यतिरिक्त 15 प्रॉपर्टी आहेत. या मालमत्ता त्याच्या आईच्या नावाने आहे.
 
होऊ शकला नाही लिलाव
- मागील वर्षी इन्कम टॅक्स विभागाने दाऊदच्या या घराचा लिलाव करण्याचे जाहीर केले होते. पण नंतर अतिक्रमणाचा मुद्दा समोर आल्यानंतर हा लिलाव रद्द करण्यात आला.
- ग्रामपंचायतीतही दाऊदची मालमत्ता ताब्यात घेण्याविषयी प्रस्ताव आला होता. पण प्राप्तीकर विभागाने तो फेटाळून लावला.
- आता पोलिस या भागात गस्त घालत आहेत. विशेषत: अज्ञात व्यक्ती येत जात असल्याने येथे लक्ष ठेवणे गरजेचे ठरत आहे.
 
बंगल्याविषयी आहेत अनेक कथा
- दाऊदच्या या बंगल्याला अनेक जण भूत बंगालाही म्हणतात. 
- काही जण म्हणतात दाऊद वेश बदलून याठिकाणी येत असतो.
- या कथांवर विश्वास न ठेवताही अनेक जण इथे येतात. पोलिसांनी मात्र सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी याठिकाणी येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
- या भागात दाऊदचे अनेक नातलग राहतात. ते या मालमत्तेवर लक्ष ठेवत असल्याचेही सांगण्यात येते.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...