आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्या हॉटेलची ४.२८ कोटींमध्ये विक्री, देशसेवा समितीने केली खरेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल्ली जायका’ हॉटेलसाठी आयकर विभागाकडून 1 कोटी 18 लाखांची किमान किंमत निश्चित केली होती. - Divya Marathi
‘दिल्ली जायका’ हॉटेलसाठी आयकर विभागाकडून 1 कोटी 18 लाखांची किमान किंमत निश्चित केली होती.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईस्थित बारा मालमत्तांपैकी एक पाकमोडिया स्ट्रीट क्रमांक चारवरील हॉटेल रोनक अफरोजचा (नंतरचे दिल्ली जायका) बुधवारी अखेर लिलाव झाला. मुंबईतील निवृत्त पत्रकार एस. बालकृष्णन यांनी तब्बल ४ कोटी २८ लाखांची बोली लावून ही मालमत्ता खरेदी केली. आपल्या देशसेवा समितीच्या वतीने या जागी अशफाख उल्लाह खान यांच्या नावे गरीब मुलांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा एस. बालकृष्णन यांचा मानस आहे.

एकोणीसशे नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिमने भारताबाहेर पलायन केल्यानंतर त्याच्या राज्यभरातील मालमत्ता आयकर विभागाने सील केल्या होत्या. मुंबईत दाऊदच्या तब्बल बारा मालमत्ता आयकर विभागाच्या ताब्यात आहेत.

आर्थिक मदतीचे आवाहन
मुंबईतील अश्विन अँड कंपनी या सरकार मान्यताप्राप्त लिलाव कंपनीद्वारे मुंबईच्या हॉटेल डिप्लोमॅटमध्ये सकाळी अकरा वाजेपासून या मालमत्तेसाठी बोली सुरू झाली. बोलीत मुंबईतील दाऊदी बोहरा समाज ट्रस्ट व एस. बालकृष्णन यांची देशसेवा समिती सहभागी होती. या मालमत्तेची किमान किंमत १ कोटी १८ लाख रुपये ठेवली होती. दोन तास चाललेल्या या बोलीत दाऊदी बोहरा समाज ट्रस्टच्या वतीने ४ कोटी २७ लाखांपर्यंतची बोली लावली. त्यापेक्षा एक लाख रुपये जास्त बोली लावत बालकृष्णन यांनी ४ कोटी २८ लाखांत ही मालमत्ता विकत घेतली. एवढी रक्कम कशी उभी करणार असे विचारले असता, बालकृष्णन म्हणाले की, हे आमच्या संस्थेच्या आवाक्याबाहेरचे असल्याने या रक्कम उभारणीत देशवासीयांनी सढळ हस्ते मदत करावी.

टप्प्याटप्प्याने १२ मालमत्तांचा लिलाव
- राजगारा मॅन्शन
- डांबरवाला बिल्डिंग
- पाकमोडिया स्ट्रीटवरील दोन व्यावसायिक गाळे
- याकुब रोडवरील दोन व्यावसायिक गाळे
- याच मार्गावरील २४ निवासी इमारती
- जयराजभाई लेन ताडदेव येथील तीन गाळे
- टेमकर स्ट्रीटवरील प्लॉट क्रमांक २२
- घासवाला बिल्डिंगमधील दोन सदनिका
- म्हाडा बिल्डिंग क्र. ४९
- नागपाड्यात गॉर्डन हॉल इमारतीतील सदनिका
- गरिब नवाज गेस्ट हाऊस व इस्माईल बिल्डिंग

पुढील स्‍लाइड्सवर वाचा,हिंदू महासभेने घेतली दाऊदची कार..?, १९८० : येथेच राहायचा दाऊद...अशी असेल मालमत्ता ताब्यात घेण्याची पुढील प्रक्रिया...