आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार बालकृष्णन यांच्याकडून हॉटेल दिल्ली जायकाची 4.28 कोटींना खरेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील संपत्तीचा लिलावाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवरील त्याच्या ‘दिल्ली जायका’ हॉटेलसाठी आयकर विभागाकडून 1 कोटी 18 लाखांची किमान किंमत निश्चित केली होती. मात्र, पत्रकार एस बालाकृष्णन यांनी दाऊदचे हॉटेल 4 कोटी 28 लाख रूपयांना खरेदी केले आहे. तसेच दाऊदच्या गाडीची 3 लाख 32 हजार रुपयांना खरेदी हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे. दाऊदच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह ते ही पेटवून जाळून टाकणार आहे. या लिलाव खरेदी प्रक्रियेत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनीही सहभाग घेतला आहे.
दरम्यान, दाऊदची आणखी एक काही मालमत्ताची बोली सुरु आहे. सरकारने ही मालमत्ता ताब्यात देण्याबाबत कोणतेही आश्वासन न दिल्याने बोली लावणा-या व्यक्तीने त्यातून माघार घेतली आहे. 2001 साली दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदची काही मालमत्ता खरेदी केली होती. मात्र, त्यांना सरकारने ताबा दिला नाही. तसेच दाऊदच्या लोकांनी या संपत्तीवरील हक्क सोडला नाही.
पुढे पाहा, कोणी खरेदी केली ती कथित गाडी...
बातम्या आणखी आहेत...