आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाऊद इब्राहिमच्या मुलाबाबत इक्बालने दिली माहिती, म्हणाला अंडरवर्ल्डमध्ये नाही इंटरेस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊद नेमके काय करतोय याचीही चौकशी इक्बालकडे कऱण्यात येत आहे. - Divya Marathi
दाऊद नेमके काय करतोय याचीही चौकशी इक्बालकडे कऱण्यात येत आहे.

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एकूलत्या मुलाबाबत इक्बाल कासकरने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मोईन हा दाऊदचा मुलगा 'हाफिज ए कुराण' बनलाय अशी माहिती त्याने दिली आहे. दाऊदने आपल्या कुटुंबाला डी कंपनीच्या गोरखधंद्यापासून दूर ठेवले आहे. 

 

दाऊदचा भाऊ इक्बाल याच्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. इक्बालने दिलेल्या या माहितीमुळे ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकालाही जबर धक्का बसला आहे.

दाऊदचा एकूलता मुलगा मोईन याला दाऊदच्या गोरखधंद्यात अजिबात रस नाही. मात्र, मोईनचा ओढा धार्मिक बाबींकडे जास्त आहे. तो एवढा धार्मिक आहे की, तो आता 'हाफिज ए कुराण' बनलाय. म्हणजेच त्याने कुराण अगदी तोंडपाठ केले आहे. कराचीतल्या एका मशिदीत तो मौलाना बनलाय. आणि इस्लाम धर्माचे धडे इतरांना देत आहे.

 

दाऊदचा मोठा कट?
यामागे दाऊदचा एखादा मोठा कट असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मौलाना झालेल्या मुलाचा वापर करण्याची दाऊदची काहीतरी गुप्त योजना असावी, असे सांगितले जात आहे. धर्माच्या नावाने लोकांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करायचे. धर्माच्या आडून आपली काळी कमाई पांढरी करून घ्यायची. चॅरिटीच्या नावाखाली काळा पैसा इतर देशांना पोहोचवायचा आणि ड्रग्ज, सट्टा, शस्त्रास्त्र खरेदीसाठी हा पैसा वापरायचा, असा हा कट असू शकतो, अशी चर्चा आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

 

बातम्या आणखी आहेत...