आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्‍या भाच्याचे लग्‍न, मुंबईत ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्‍त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरचा याचा विवाह सोहळा आज मुंबईत पार आहे. दाऊद या विवाह सोहळ्यात स्काईपद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळत आहे.
- अलीशाह पारकर हा दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकरचा मुलगा आहे.
- हसीना पारकरचा दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
- मीडिया रिपोर्टनुसार, दाऊदच्‍या कुटुंबाच्‍या सुत्रांनी सांगितले की, 60 वर्षीय दाऊद
पाकच्‍या कराचीमध्‍ये आहे आणि स्काइपव्‍दारे तो या लग्‍नसोहळ्यात सहभागी होऊ शकतो.
- अलीशाहच्या विवाहावर मुंबई पोलिसांसह गुप्तचर विभागाची करडी नजर आहे.
- या लग्नसमारंभातील पाहुणे, त्यांच्या गाड्या आणि गाड्यांच्या नंबरवर व्हिडीओग्राफीमार्फत नजर ठेवली जाणार आहे.
जुहूमध्‍ये होणार रिसेप्शन..
- लग्नसोहळा ऑनलाईन दाखवला जाऊ शकतो, यामुळे लाईव्ह चॅट व स्काईपवरही गुप्तचर यंत्रणेची नजर असेल.लग्नाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
- जुहू येथील हॉटेल तुलिपमध्ये रिसेप्शन होणार आहे. या भागातही पोलिसांचा बंदोबस्‍त आहे.
- अलीशाहच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर उपस्थित राहणार.
- यापूर्वी दाऊदचा भाचा दानिशचा विवाह झाला होता. त्‍यावेळी डी कंपनीतील अनेक लोक होते.
पुढे पाहा, अशी आहेे लग्‍नाची पत्रिका..
बातम्या आणखी आहेत...