आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawoods Latest Frantic Bid To Kill Chhota Rajan Foiled

छोटा राजनचा \'गेम\' करण्याचा दाऊदचा \'डाव\' पुन्हा फसला, \'हिंदू डॉन\' पसार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पुन्हा एकदा आपला शत्रू छोटा राजनला मारण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, हिंदू डॉन छोटा राजन पुन्हा एकदा दाऊदला हुलकावणी देण्यात यशस्वी झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दाऊदचा जवळचा हस्तक छोटा शकीलने राजनच्या एका विश्वासू साथीदाराला फोडले व राजनला ऑस्ट्रेलियात मारण्याची प्लॅन आखला. मात्र, दाऊदचे शार्पशूटर आपल्याला मारण्यास येत असल्याची टीप राजनला मिळताच तो ऑस्ट्रेलियातील एका प्रांतातून पसार झाला व दाऊदचा पुन्हा एकदा त्याचा गेम करण्याचा डाव फसला. कधी काळी दाऊदचा खास राहिलेल्या छोटा राजनला दाऊदच्या तोडीचा गॅगस्टर मानले जात होते. याच कारणामुळे दाऊदला शह देण्यासाठी त्याला हिंदू डॉन म्हणून सादर केले.
असा फसला प्लॅन-
दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरूनच छोटा शकीलने छोटा राजनचा गेम करण्याचे षडयंत्र रचले. छोटा शकीलने राजनच्या एका साथीदाराला फोनवरून संपर्क साधला व त्याला लालच दाखवले. त्यामुळे राजनच्या पंटरने तो ऑस्ट्रेलियात राहत असल्याचे सांगितले. राजनचा हा हस्तक भारतातच राहतो. भारतीय तपास यंत्रणाचे त्याच्यावर लक्ष होते. शकील आणि राजनच्या हस्तकाची फोनवरील बातचीत हिंदी व उर्दुत सुरु होती. तपास यंत्रणाला याचा सुगावा लागताच त्यांची बातचीत इंटरसेप्ट करून घेतली.
काय म्हटले शकीलने-

शकीलने राजनच्या हस्तकाला सांगितले की, “राजन स्वत:ला देशभक्त समजतो. मागील वेळी तो वाचला होता पण आता तो वाचणार नाही. आमच्याकडे ताकद आहे, पैसा आहे तर तो भीतीने इकडे तिकडे भटकतो आहे. तू आम्हाला ही मदत केली तर तुला फायदा होईल. भाई (दाऊद) तुला हवा तो इनाम देईल. यानंतर राजनच्या हस्तकाने सांगितले की, राजन सध्या ऑस्ट्रेलियातील न्युकासलमध्ये राहतो. त्यानंतर अरब देशातून दाऊदने काही शॉर्पशूटर्स ऑस्ट्रेलियात पाठवले. शकीलने त्यांना आदेश दिला की, यावेळी राजनचा गेम कोणत्याही स्थितीत झालाच पाहिजे.
राजनला मिळाली 'खबर'-
शकीलने राजनचा गेम करण्याची तयारी केली होती तर, राजन गँगचे लोकही त्यावर नजर ठेवून होते. त्यातच एका अज्ञात व्यक्तीने राजनला शकीलच्या प्लॅनची माहिती दिली. त्यामुळे न्यूकासलमधून राजन काही तासातच अंडरग्राऊंड झाला. 2000 मध्ये दाऊदच्या टोळीने छोटा राजनवर बॅंकॉक (थायलंड)मधील एका मार्केटमध्ये हल्ला केला होता. यात राजन गंभीर जखमी झाला होता. तरीही तो तेथून निसटण्यात यशस्वी झाला होता. आताही हल्ला होण्याच्या आधीच छोटा राजन तेथून पसार होत चकवा देण्यात यशस्वी ठरला आहे. भारतीय तपास यंत्रणांनी यावर भाष्य करणयास नकार दिला आहे.