आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daya Nayak Life Hotel Boy Turned 'encounter Specialist With 83 Kills

PHOTOS : 83 एन्काउंटर करणारा दया नायक होता हॉटेलमध्ये वेटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे कारण देऊन ‘एन्काउंटर फेम’ पोलिस उपनिरीक्षक दया नायकला निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दया नायक यांची मुंबईत नियुक्ती करा, अशी शिफारस खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असताना पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी नायक यांचा वादग्रस्त पूर्वेतिहास लक्षात घेता त्यांना मुंबईत नियुक्त करून घेतले नाही. त्यांची नागपूरला बदली केली व तिथे रुजू न झाल्याचे कारण देत सरळ बाहेरचा रस्ता दाखवला अशी माहिती आहे.

मुंबईत अंडरवर्ल्डसोबत दोन हात करणारा 'रिअल हिरो' अशी ख्याती असलेल्या दया नायक यांच्या कारकिर्दीबद्दल दिव्य मराठीच्या वाचकांसाठी ही त्यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आम्ही येथे देत आहोत.
हा पोलिस उपनिरिक्षक सुरूवातीला हॉटेलमध्ये टेबल साफ करत होता. मात्र त्याची जिद्द आणि आत्मविश्वासाने त्याला एक 'नायक' बनवले. काही वर्षांपूर्वी हॉटेलात टेबल पुसण्याचे काम करणार्‍या दयाला आज लोक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखतात.
निडर होण्याबरोबरच दया यांचा निशाणा एकदम पक्का आहे. गुन्हेगारी जगतातल्या गुन्हेगारांना पकडता पकडता दया यांना स्वप्नात सुध्दा वाटले नव्हते की, त्यांचेही नाव मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर येईल. 90 च्या दशताक अंडरवर्ल्ड विरोधात सुरू झालेल्या अभियानात या एन्काऊंटर स्पेशलिस्टने तब्बल 83 एन्काऊंटर केले आहेत.

बॉलिवूडमध्ये बनले चित्रपट
दया नायक यांच्या पात्राला अनेक वेळा रुपेरी पडद्यावर चित्रित करण्यात आले आहे. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी दया नायक यांचे पात्र रंगवले आहे. तर टिव्हीवरीलही अनेक कार्यक्रमात दया यांचे पात्र साकारण्यात आले आहे.

हॉटेलमध्ये करत होते काम
दया मुळचे कर्नाटकातील आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने त्यांनी सातवीपर्यंत शाळा शिकल्यानंतर ते 1979 ला मुंबईला आले. येथे दया एका हॉटेलमध्ये काम करत होते. हॉटेलचा मालक दयाला पगार देत असे. त्यांनीच दयाला पदवीपर्यंत शिकवले. त्यानंतर पोलिसात नोकरी लागण्याच्या आधी आठ वर्षांपर्यंत दयाची ही नोकरी सुरू होती. त्याचबरोबर दया यांनी काही दिवसांपर्यंत 3000 रुपये प्रति महिना अशा रोजावर नोकरीही केली आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, दयाला का भेटली शाबासकी....