आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daya Nayak Life Hotel Boy Turned \'encounter Specialist With 83 Kills

दया नायक होते हॉटेलमध्ये वेटर; पहिल्या एन्काऊंटरनंतर मिळाली होती शाबासकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘एन्काउंटर फेम’ पोलिस उपनिरीक्षक दया नायक यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. लवकरच त्यांना मुंबईत नियुक्ती दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे दया नायक यांची मुंबईत नियुक्ती करा, अशी शिफारस खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केली होती.
मात्र, नायकांचा वादग्रस्त पूर्वइतिहास पाहाता त्यांची मुंबईत नियुक्ती करता येणार नसल्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी म्हटले होते.


मुंबईत अंडरवर्ल्डशी दोन हात करणार्‍या दया नायक यांच्या कारकिर्दी तशी वादग्रस्तच ठरली आहे. नायकांविषयी जाणून घेण्याची वाचकांना कायम उत्सुकता राहिली आहे. आज आम्ही आपल्याला दया नायक कोण? ते पोलिस सेवेत रुजू होण्यापूर्वी काय करत होते? याविषयी माहिती देत आहोत.

पुढील स्लाइडवर वाचा, हॉटेलमध्ये टेबल साफ करायचे दया नायक...