आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ती\' तरुणी गर्भवती असल्याची शंका, 48 तासांपूर्वी तुकडे करुन फेकला मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतुजवळ नागरिकांना दुर्गंधी येत असल्यामुळे पोलिसांना त्याची सुचना देण्यात आली. रिक्लेमेशन किना-याजवळ पोलिसांनी तपास केला असता त्यांना पोत्याचे एक गाठोडे सापडले. त्यात एका तरुणीच्या मृतदेहचे तुकडे होते. तरुणीला मारण्याआधी ती गर्भवती किंवा तिचा गर्भपात केला असण्याची शंका अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. (काय म्हणाले विश्वास नांगरे पाटील, वाचा पुढील स्लाइडमध्ये)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कमरेखालच्या भागाचे अवयव पोत्यात सापडले आहेत. उर्वरित भाग अशाच पद्धतीने फेकून दिला असण्याची शक्यता आहे. अतिशय नियोजनबद्धरित्या हा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मृतदेहाच्या इतर भागाचा शोध सुरु असून सी-लिंकच्या आसपास शोध घेण्यात आहे.

तरुणीच्या कपड्यांवरून ती उच्चभ्रू कुटुंबातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तरुणीचे वय साधारण 25 वर्षांच्या जवळपास असण्याची शक्यता असून तिची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत.