आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटकेसमध्ये सापडला ब्युटिशियन तरुणीचा मृतदेह; हातपायही तोडलेले, शीरही धडापासून वेगळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबईतील नेरुळ भागातील पाम बीच रोडवर सुटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मरियम शेख (24) असे मृत तरुणीचे नाव असून ती ब्युटिशियन होती. तरुणी मूळची गोवंडी येथील होती.  याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नेरुळमधील पाम बीच रोडवर आज ( मंगळवारी) एका काळ्या सुटकेसमध्ये तिचा मृतदेह सापडला होता. तरुणीचे शीर धडापासून वेगळे केले आहे. हातपाय तोडले आहे. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले का? हे स्पष्ट होईल.

आज येईल पोस्टमार्टम रिपोर्ट...
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पामबीच मार्गावर तलावाच्या शेजारी झुडपांमध्ये एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता.
- तिचे वय जवळपास 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान आहे. मारेकर्‍याने तरुणीचे शीर धडापासून वेगळे करून ते सुटकेसमध्ये ठेवले होते. तुरुणीच्या अंगावर सलवार कुर्ता होता.
- याप्रकरणी सीवूडमधील एनआरआय पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
- आज तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट येईल. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले का? हे स्पष्ट होईल.

अशी पटली तरुणी ओळख...
- पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो मुंबई आणि ठाण्यातील सर्व पोलिसांना पाठवली. त्यानंतर काही तासांतच तरुणीची माहिती मिळाली.
- रविवारी रात्री मुंबईतील शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये मरियम शेख नामक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

वाशीमधील ब्युटीपार्लरमध्ये करत होती काम...
- ती वाशीमधील एका ब्यूटीपार्लरमध्ये काम करत होती. ती शिवाजी नगरमधील रफीक नगरात आई- वडील आणि भावासोबत राहात होती.
- मरियमच्या नातेवाईकांनी सांगितले की, ती दररोज रात्री 10 वाजेपर्यंत घरी परत येत होती. रात्री उशीर झाला तरी ती घरी न परतल्याने पोलिस स्टेशनला ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...