आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dearness Allowance Hiked By 6%; Diwali Gift For Maharashtra Govt Employees

Diwali gift: सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए सहा टक्क्याने वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ६ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १ जानेवारी २०१५ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १०७ टक्के डीए मिळतो. या निर्णयामुळे तो आता ११३ टक्के झाला आहे.

मूळ वेतन व ग्रेड पेच्या एकूण रकमेवर डीए मोजला जातो. १ ऑक्टोबर २०१५ पासून डीएची थकबाकी देण्यात येईल. १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतची थकबाकी अदा करण्यासाठी स्वतंत्र आदेश काढू, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या निर्णयाचा १८ लाख कर्मचारी आणि ६.५ लाख पेन्शनर्सना फायदा होईल.