आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत घोड्यावरुन पडल्याने 6 वर्षीय मुलगी ब्रेनडेड, हॉर्स रायडरला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.

मुंबई- घोड्यावरुन सैर करणाऱ्या 6 वर्षांच्या मुलीचा घोड्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या बाजूला असणाऱ्या राजीव गांधी उद्यानात घोड्यावरून पडल्याने या मुलीच्या डोक्याला जबर इजा झाली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. जान्हवी शर्मा असे या मुलीचं नाव असून ती बालवाडीत शिक्षण घेत होती. उद्यानात हॉर्स राइडिंग करत असताना जान्हवी घोड्यावरून पडली. यामध्ये तिच्या मेंदूला जबर दुखापत झाली असून तिला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले आहे. 

याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी हॉर्स रायडर सोहम जयस्वाल (30) याला अटक केली आहे. रविवारी संध्याकाळी जान्हवी तिच्या आई-वडिलांबरोबर उद्यानात गेली असताना सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली. जान्हवीचे वडील  महेंद्र शर्मा एका खासगी कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 

रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पोलिसांना बॉम्बे हॉस्पिटलमधून फोन आल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. हॉस्पिटलमध्ये आणल्यावर मुलीला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले. तिला डोक्याच्या आतमधील भागात गंभीर दुखापत झाली होती. तसेच हॉस्पिटलमध्ये आणताना तिच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

 

बातम्या आणखी आहेत...