आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशकंदीलातील वीज प्रवाह ग्रीलमध्ये उतरल्याने शॉक बसून मायलेकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.

मुंबई- आकाशकंदीलातील वीज प्रवाह ग्रीलमध्ये उतरुन शॉक लागल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे व अधिक चौकशी सुरू आहे.

प्रियांका भारती (वय 27 वर्ष ) आणि प्रिन्स (वय 6 वर्ष) असे या मृ्त्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. भारती या गृहिणी होत्या. गोरेगाव पूर्वच्या बीबीसारनगर येथील म्हाडा कॉलनीमध्ये पती आणि सहा वर्षांच्या मुलीसह त्या राहत होत्या. त्यांचे पती खासगी कंपनीत कार्यरत आहेत.

शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्या फ्लॅटच्या गॅलरीमध्ये प्रिन्सला घेऊन बसल्या होत्या. त्यांची मोठी मुलगी टीव्ही पाहत बसली होती. तर पती कामावर गेले होते. ज्या गॅलरीत प्रियांका बसल्या होत्या तेथेच आकाशकंदील लावण्यात आला होता. अचानक या कंदीलमधून विद्युतप्रवाह वाहून संपूर्ण ग्रीलद्वारे वीजेचा शॉक बसू लागला. भारती नेमक्या ग्रीलवरच बसल्या होत्या. काही कळण्याच्या आतच विजेचा जोरदार झटका प्रियांका आणि त्यांचा मुलगा प्रिन्सला बसला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...