आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी दारूचे 104 बळी, मुख्य सचिवांची चौकशी समिती सरकारकडून नियुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार शेट्टी यांनी मालवणी विषारी दारुकांडात बळी पडलेल्या मृतांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.) - Divya Marathi
(छायाचित्र: शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार शेट्टी यांनी मालवणी विषारी दारुकांडात बळी पडलेल्या मृतांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.)
मुंबई- मालाड-मालवणीतील विषारी दारू प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही समिती या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून तातडीने अहवाल सादर करणार आहे. या प्रकरणात विषारी दारूने आतापर्यंत 104 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. दरम्यान, विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी आतिक याला मुंबई पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.
या प्रकरणी पोलीस कारणीभूत ठरलेल्या सर्व घटकांची कसून चौकशी करीत आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी अवैध दारूविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदतही देण्यात येत आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आल्यानंतर सरकारकडून याबाबत कठोर पाऊले उचलण्‍यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...