आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीवर मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांमध्ये वाद; सहकारमंत्र्यांना भाजपच्याच नेत्यांनी केले टार्गेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना भाजपच्या मंत्र्यांनीच टार्गेट केले. िवनोद तावडे यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांनी अनेक शंका प्रश्न िवचारून देशमुखांना अक्षरश: भंडावून सोडले. - Divya Marathi
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना भाजपच्या मंत्र्यांनीच टार्गेट केले. िवनोद तावडे यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांनी अनेक शंका प्रश्न िवचारून देशमुखांना अक्षरश: भंडावून सोडले.
मुंबई- राज्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधी व मंत्र्यांविराेधात तक्रारींचा पाऊस पडत आहे. याचे प्रतिबिंब मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना भाजपच्या मंत्र्यांनीच टार्गेट केले. िवनोद तावडे यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांनी अनेक शंका व प्रश्न िवचारून देशमुखांना अक्षरश: भंडावून सोडले. शेवटी वाद टोकाला जात असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीवर वेगळी बैठक घेण्याचा िनर्णय घेतला. मंत्रिमंडळाची बैठक आटोपताच बैठक घेऊन कर्जमाफीसंबंधी उणिवा दूर कराव्यात आणि सप्टेंबरअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील यासाठी पुढाकार घ्यावा, असे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह संबंिधत खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.

कर्जमाफीवरून शिवसेनेने सोमवारी राज्यभर मोर्चे काढले. शिवसेनेचे मंत्री कर्जमाफीवरून रान उठवत असताना आपण मागे राहिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील या शंकेपोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपच्या मंत्र्यांनी सहकारमंत्र्यांना घेरले.

तावडेंचीही तक्रार
-  अजून लाभार्थींची अंितम यादीच तयार नाही. िकती वाट पाहणार? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केल्याचे कळते.
- पुढील महिन्यात ग्रा. पं. निवडणुका होत आहेत. कर्जमाफीचा परिणाम भाजपवर होऊ शकतो. यामुळे अनेक मंत्री  िचंतेत असल्याचे िदसून आले.
- सध्या ज्या पद्धतीने योजनेची अंमलबजावणी होत आहे ती पाहता ८९ लाख शेतकरी लाभार्थी होतील, अशी स्थिती नाही. अातापर्यंत ४० लाखच अर्ज आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...