आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा शेतकरी नेता होण्याचा सदाभाऊ खोतांचा मनसुबा राजू शेट्टी यांनी जाणला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कधीकाळचे ‘फायरब्रँड’ नेते सदाशिव खोत यांना हकालपट्टीच हवी आहे. “संघटना मी सोडली नाही. राजू शेट्टी यांचे नेतृत्व मान्य करूनही संघटनेने मला बाजूला केले,” असा दावा करत ‘मराठा विरुद्ध जैन नेतृत्व’ असा संघर्ष उभा करण्याचा खोत यांचा प्रयत्न आहे. यातून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न खोतांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.  मात्र, खोत यांचा हा मनसुबा ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जाणला. त्यामुळेच खोत यांच्या हकालपट्टीची उत्स्फूर्त मागणी कार्यकर्त्यांनी करूनदेखील शेट्टी यांनी लगेच निर्णय घेतला नाही. लोकशाही पद्धतीने समिती नेमून खोत यांना समितीपुढे येण्याचा पर्याय त्यांनी खुला ठेवला. दरम्यान, बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळपासून खोत ‘नॉट रिचेबल’ होते.  

‘स्वाभिमानी’च्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. या बैठकीत खोतांना जाब विचारून त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यासाठी चारसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मात्र, कार्यकारिणीच्या आग्रहानंतर खोतांबद्दलचे सर्वाधिकार शेट्टी यांना देण्यात आले. खोत यांच्यावर तिखट टीका करून त्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शेट्टी यांनी अडवले नाही. ‘नासका आंबा’ अशी बहुतेकांनी खोत यांची संभावना केली. त्यानंतर “तुमच्या मनातलाच निर्णय मी घेईन,” असे सांगत शेट्टी यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांवर फुंकर घातली.  गेल्या काही महिन्यांपासून खोत आणि शेट्टी यांच्यातील संघर्ष टिपेला पोचला आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून एकमेकांविरोधात राळ उठवली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारच्या बैठकीकडे संघटनेचे लक्ष लागले होते. वास्तविक शेट्टी यांनीच खोत यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. मात्र, मंत्री झाल्यानंतर खोत संघटनेपासून दुरावले.  

संघटनेशी कोणतीही चर्चा न करता ते परस्पर निर्णय घेऊ लागले. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला भाजप महायुतीतला घटक पक्ष म्हणून राजू शेट्टी यांना सन्मानाने बोलावणे अपेक्षित होते. मात्र, भाजप सरकारकडून ती चूक घडली. त्या वेळी खोत यांनी संघटनेच्या अध्यक्षांबरोबर राहणे अपेक्षित असताना ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. खोत आणि संघटनेत पडलेली ही पहिली ठिणगी होती. त्यानंतर खोत संघटनेच्या भूमिकांपेक्षा भाजपचीच तरफदारी करू लागले, असा कार्यकर्त्यांचा रोष आहे.  जिल्हा परिषद निवडणुकीत खोत यांनी स्वत:च्या मुलाला उभे केले. त्याच्या प्रचाराला शेट्टी गेले नाहीत. शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला खोत आले नाहीत. खोत यांच्या वर्तनात आणि आर्थिक स्थितीत पडलेला फरक हादेखील संघटनेसाठी नाराजीचा विषय बनला. शेतकरी संप मोडीत काढण्यात खोतांनी महत्त्वाची भूमिका बजावली, हा आरोप खोतांवर आहे. 
बातम्या आणखी आहेत...