आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड महाराष्ट्रवादी अण्णाभाऊंच्या जयंतीदिनीच विदर्भावरून वादावादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संयुक्त महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९६ व्या जयंतीदिनीच विदर्भवादावरून सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभर ठप्प झाले. काहीही होवो, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेनेनेही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर फडणवीस सरकारला जाब विचारला. मात्र स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा कोणताही प्रस्ताव आपल्या सरकारसमोर नाही, असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. विधानसभा आणि विधान परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधकांबरोबरच सत्ताधारी शिवसेनेनेही अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. काहीही होवो, पण आम्ही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असा निर्धार करत त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर फडणवीस सरकारला जाब विचारला. या विषयावर विराेधकांनी केलेल्या गदाराेळामुळे विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहांचे कामकाज साेमवारी दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नारायण राणे यांनी अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. मुंडे म्हणाले की, अखंड महाराष्ट्राची सरकारला अडचण होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. आज अण्णाभाऊ साठे यांची ९६ वी जयंती आहे. अण्णाभाऊंनी अखंड महाराष्ट्राची ज्योत तेवत ठेवण्यासाठी पोवाडे रचले, चळवळ उभी केली. अखंड महाराष्ट्रासाठी ४६ हजार जण कारागृहातही गेले. अखंड महाराष्ट्राचा मुद्दा महत्त्वाचा आहे, यावर चर्चा होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली.
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. देशाच्या लोकसभेत भाजपच्या खासदाराने वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीचा अशासकीय ठराव मांडला. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. हे सभागृह अखंड महाराष्ट्राचे सभागृह आहे. सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राची शपथ घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य तोडण्याची भाषा करणारे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची मागणी मुंडे यांनी केली. दरम्यान, विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. या वेळी विरोधकांनी अखंड महाराष्ट्रासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली.
पुढे वाचा...
> विदर्भ हवा असेल तर राजीनामा द्या
>सरकारची भूमिका ‘ब्रेक इन महाराष्ट्र’ची
>शिवसेना-भाजपत फूट पाडण्याचा डाव
>अखंड महाराष्ट्राचा एकमुखी जयघोष
बातम्या आणखी आहेत...