आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेबिट कार्डवरून 1 हजारावर रकमेची शॉपिंग हाेणार स्वस्त; कमी रकमेची खरेदी महागणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवीन वर्षात डेबिट कार्डद्वारे केलेली १ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची 

खरेदी स्वस्त होईल. मात्र, यापेक्षा कमी रकमेची खरेदी किंचित महाग पडेल. कार्ड खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने मर्चंट डिस्काउंट रेटची (एमडीआर) नवी पद्धत निश्चित केली आहे. आजवर खरेदीच्या रकमेनुसार शुल्क अाकारले जात होेते. आता ते दुकानदाराच्या उलाढालीवर आकारणी होईल. बँका आता छोट्या दुकानदारांकडून प्रति ट्रान्झॅक्शन कमाल २०० रु., मोठ्या दुकानदारांकडून १ हजारहून जास्त शुल्क घेऊ शकणार नाहीत. कार्डने पेमेंट केले तर बँका दुकानदारांकडून शुल्क घेतात. यालाच एमडीआर असे म्हणतात. दुकानदार हे शुल्क ग्राहकांकडूनच वसूल करतात. रिझर्व्ह बँकेचा हा आदेश १ जानेवारी २०१८ पासून लागू होईल. २०१६-१७मध्ये पीओएस टर्मिनलवर डेबिट कार्डचा वापर २१.९ टक्के होता. तो अजूनही वाढत नाही. म्हणूनच रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला.

 

५ हजारांच्या खरेदीवर २० रुपये शुल्क

- वार्षिक २० लाख उलाढालीच्या व्यापाऱ्यांकडून बँक व्यवहार शुल्कापोटी एकूण रकमेवर ०.४० टक्केहून अधिक एमडीआर आकारता येणार नाही. म्हणजे ५ हजारांच्या खरेदीवर २० रुपये शुल्क असेल.

- क्यूआर कोडनेे खरेदीवर ते ०.३०% पेक्षा जास्त नसेल. कमाल शुल्क २०० रुपये असेल. { २० लाख उलाढालीच्या व्यापाऱ्यांना हे शुल्क आकारणीची मर्यादा ०.९० टक्के असेल.

 

> ५ हजारांच्या व्यवहारांवर ४५ रु.लागतील. क्यूआर कोड पेमेंटला ०.८०% शुल्क असेल. प्रति ट्रान्झॅक्शन कमाल १ हजार रु. शुल्क आकारता येईल.

बातम्या आणखी आहेत...