आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद, जालन्यात दिवाळीपूर्वी कर्जमाफी; आधार क्रमांक जाेडून दिलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/साेलापूर- आधार क्रमांक दिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी मिळावा म्हणून विहित नमुन्यातील माहिती तातडीने अपलोड करण्याबाबत बँकांना निर्देश दिले आहेत. बँकांकडून परिपूर्ण माहिती मिळालेल्या जिल्ह्यांत दिवाळीपूर्वी कर्जमाफी होईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, अकोला, यवतमाळ, जालना, चंद्रपूर व जळगाव या जिल्ह्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्जमाफी अर्जांची सॉफ्टवेअर छाननी व  चावडी वाचनातील सूचनांनुसार तालुकास्तरीय समितीकडून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार केली जात अाहे. नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्याने देणे असलेली प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बचतखात्यात जमा करण्यात येईल.
 
५६ लाख अर्ज आले 
{ २२ सप्टेंबरअखेर ५६ लाख ५९ हजार अर्ज आले आहेत. त्यात ७७ लाख २९ हजार खातेदारांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...