आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजातील शेती गटांना 10 लाखांपर्यंत कर्ज; क्रांती मोर्चासाेबत सकारात्मकच चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक कार्यवाही करत अाहे. अखत्यारीतील ९०% मागण्यांवर कार्यवाही केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टात बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी समन्वय समितीने सूचना द्याव्यात, असे आवाहन महसूल मंत्री तथा मराठा माेर्चासंबंधी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी बैठकीत दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत शेती गटांना १० लाखांपर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.  

पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, ते राज्य शासनामार्फत चालवण्याची सूचना समन्वय समितीने केली आहे. तसेच मराठा समाजासाठी ‘सारथी’ संस्था स्थापली असून तिची रचना व कार्यपद्धतीसंबंधीचा ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांच्या समितीचा अहवाल अंतरिम अहवाल या महिनाअखेरपर्यंत मिळणार असून डिसेंबरअखेरपर्यंत अंतिम अहवाल सादर होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...