आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Declear The Drought In Marathwada; Fomer Chife Minister Nilankekar Demand

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा ; माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुष्काळाचे भीषण चटके बसत असलेल्या मराठवाड्याकडे सरकारने दुर्लक्ष केले असून येथील आठही जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुंबईत केली आहे़ दुष्काळासाठी शेतीची पैसेवारी काढण्याची शासनाची पद्धत अत्यंत चुकीची असून आघाडी सरकारचे प्रशासन म्हणजे अक्षरश: वेड्यांचा बाजार असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली़

मराठवाड्यातील दुष्काळी प्रश्नाबाबत निलंगेकर म्हणाले की, राज्यातील टंचाईची पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रशासन यंत्रणा अजूनही ब्रिटिशकालीन पद्धतीचाच वापर करत आहे. या पद्धतीनुसार एखाद्या मंडळातील पर्जन्यमान मोजून त्यावरून संपूर्ण तालुक्याची सरासरी काढून पैसेवारी जाहीर केली जाते़ यात ज्या भागात अत्यंत कमी पाऊस झाला असेल त्यांच्यावर अन्याय होतो़ यासाठी मंडळनिहाय पर्जन्यमानानुसार पैसेवारी जाहीर करायला हवी, अशी सूचना निलंगेकर यांनी राज्य सरकारला केली़

मुख्यमंत्र्यांवर नाराजी
मराठवाड्यात भीषण दुष्काळ असतानाही मुख्यमंत्री तिकडे अद्याप फिरकले नसल्याबाबतही निलंगेकर यांनी नाराजी व्यक्त केली़ चारा छावण्यांबाबतही मराठवाड्यावर अन्याय होत असून पाण्यासाठी बोअरवेल 300 फुटांऐवजी 500 फूट खोल खोदण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली़

सगळा वेड्यांचा बाजार
सध्या प्रशासन दुष्काळी परिस्थितीबाबत चुकीची आकडेवारी मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसनमंत्र्यांना देत असल्याने दुष्काळाची मदत संथगतीने सुरू आहे. चुकीचे माहिती देणारे प्रशासन आणि त्यानुसार वागणारे सरकार हा साराच वेड्यांचा बाजार झाला असल्याने मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.