आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळामुळे देशातील साखर उत्पादनात घट, राज्यातही साखर उत्पादन निम्म्यावर येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र अाणि कर्नाटक या दाेन्ही राज्यांना गेल्या वर्षी बसलेल्या दुष्काळाच्या फटक्याचा ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला अाहे. परिणामी या वर्षीच्या हंगामात देशातील साखर  उत्पादन १५ टक्क्यांनी घटणार असल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) म्हटले अाहे.  

गेल्या वर्षातल्या  १ काेटी ७० लाख  टनांच्या तुलनेत २०१६-१७ च्या विपणन वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत साखरेचे उत्पादन घसरून १ काेटी ४० लाख टन झाले असल्याचे इस्मा संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अाकडेवारीमध्ये म्हटले अाहे. मागील वर्षात देशात २ काेटी  ५० लाख टन साखर उत्पादन झाले हाेते.  

गेल्या वर्षीच्या अाॅक्टाेबरपासून ते यंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंत देशभरातील साखर कंपन्यांच्या विक्रीमध्येही  ७ लाख ५० हजार  टनांनी घट झाली अाहे. गेल्या वर्षीच्या अाॅक्टाेबरपासून साखरेची उचल कमी प्रमाणात हाेत असून हा कल असाच राहताे की फेब्रुवारी महिन्यात बदलताे हे बघणे महत्त्वाचे ठरेल, असे इस्मा संस्थेने म्हटले अाहे. त्याचबराेबर साखर विक्रीदेखील कमी हाेण्याची शक्यता असून ती २ काेटी ४० लाख  टन हाेण्याची शक्यता अाहे. 
 
राज्यात ८० टक्के गाळप बंद  
यंदाच्या साखर हंगामात (२०१६-१७) ४८३ साखर कारखान्यांनी गाळप केले असून त्यापैकी १९१ कारखान्यांनी गाळप बंद केले अाहे. महाराष्ट्रातल्या ८० टक्के तर कर्नाटकातील ९५ टक्के कारखान्यांनी गाळप बंद केले अाहे. दुष्काळाचा ऊस उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या हंगामातील ६० लाख २७ हजार  टनांच्या तुलनेत यंदा १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील साखरेचे उत्पादन घटून ते ३ लाख  ९७ हजार टन झाल्याचे ‘इस्मा’ने म्हटले अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...