मुंबई- नारायण राणे यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असून याची कल्पना मी विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. गोव्यातील माझ्या निवासाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यासंदर्भात राणे यांच्यावर पाच कोटींचा दावा दाखल करणार असल्याची माहिती राष्टÑवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिली. कोकणातील जनमत आता राणे यांच्या मागे नाही. त्यांनी डीपीडीसी योजनेशिवाय सिंधुदुर्गात एक पैसाही आणला नाही. गाड्यांचा ताफा घेऊन वावरणारे राणे सामान्यांचे नेते कसे? राणे म्हणजे माफिया, राणे म्हणजे गँगस्टर. असा माणूस यापुढे तरी विधानसभेत पाठवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.